शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यासाठी १२५ मे.टन चनादाळ मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:21 IST

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना चनादाळ व उडीददाळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत परभणी जिल्ह्याला १२५ मे.टन चनादाळ उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गोरगरीब नागरिकांसाठी अल्पदरात धान्य

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना चनादाळ व उडीददाळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत परभणी जिल्ह्याला १२५ मे.टन चनादाळ उपलब्ध झाली आहे.जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गोरगरीब नागरिकांसाठी अल्पदरात धान्य उपलब्ध करुन दिले जात आहे. गहू, साखर, तेल आदी खाद्यपदार्थांचे स्वस्तधान्य दुकानावरुन वितरण केले जाते. दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला असून या काळात गोरगरीब नागरिकांची होणारी परवड लक्षात घेऊन राज्य शासनाने चनादाळ आणि उडीददाळ रेशन दुकानावरुन वितरित करण्याचा निर्णय २० आॅक्टोबर रोजी घेतला आहे.या निर्णयानुसार राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अनुदानित दराने चनादाळ व उडीददाळ वितरित केली जाणार आहे. शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी दोन्ही दाळींचे नियतन निश्चित केले आहे. या नियतनानुसार परभणी जिल्ह्याला १२५ मेट्रीक टन चनादाळ उपलब्ध होणार असून ६२ मेट्रीक टन उडीददाळ उपलब्ध केली जाणार आहे. जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानावरुन या दोन्ही दाळींचे लाभार्थ्यांना वितरण केले जाणार आहे.वाढती महागाई आणि बाजारपेठेतील दाळींचे वाढलेले भाव लक्षात घेता सणासुदीच्या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दाळ उपलब्ध होत असल्याने गोरगरीब नागरिकांची आर्थिक ओढाताण थांबणार असून दिवाळीची या लाभार्थ्यांना भेट मिळणार आहे.रेशन दुकानदारांना आवाहन४दिवाळीचा सण जवळ येऊन ठेपला आहे. या काळात गोरगरीब लाभार्थ्यांसाठी स्वस्तधान्य दुकानांमार्फत मिळणाऱ्या दाळी उपयोगी ठरु शकतात. जिल्ह्यासाठी चनादाळ व उडीद दाळीचे नियतन मंजूर झाले असून रेशन दुकानदारांनी तत्काळ तहसील कार्यालयामध्ये चालन भरुन दाळींची उचल करावी व लाभार्थ्यांना ही दाळ वितरित करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार