शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा :एकाच जागेवर दुसऱ्यांदा वृक्षारोपण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:30 IST

दोन वर्षांपूर्वी ज्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. त्याच जागेवर पुन्हा एकदा वृक्षारोपणाची तयारी प्रशसनाने चालविली आहे. एकाच ठिकाणी दुसºयांदा वृक्षारोपण होत असल्याने पूर्वीची झाडे गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन वर्षांपूर्वी ज्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. त्याच जागेवर पुन्हा एकदा वृक्षारोपणाची तयारी प्रशसनाने चालविली आहे. एकाच ठिकाणी दुसºयांदा वृक्षारोपण होत असल्याने पूर्वीची झाडे गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नेमिची येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे वृक्षारोपण मोहिमेचीही अवस्था झाली आहे. मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम राबविली जात आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठ्या उत्साहाने झाडे लावली जातात. त्यापूर्वी जागोजागी खड्डेही केले जातात. यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. परंतु, लावलेली झाडे जगविण्यासाठी कुठलेच प्रयत्न होत नाहीत. त्यामुुळे दरवर्षी केवळ वृक्षारोपण मोहिमाच राबविल्या जात आहेत. परंतु, झाडे मात्र वाढत नसल्याने जिल्ह्याची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.दोन वर्षापूर्वी जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. परभणी येथील गंगाखेड रोडवरील एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या परिसरात तत्कालीन पालकमंत्री तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाडे लावून जिल्ह्यातील वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात केली होती. मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम घेण्यात आला. साधारणत: अर्धा एकरचा हा परिसर असून दोन वर्षापूर्वी संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रत्येक झाडाला नामफलकही लावले आहेत. परंतु, या झाडांचे संवर्धन मात्र झाले नाही. बहुतांश झाडे जळून गेली आहेत. ही परिस्थिती प्रशासनाने दाखविली नसली तरी याच परिसरात नव्याने वृक्षारोपणाची आखणी करुन बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केला आहे.यावर्षी पुन्हा एकदा वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाणार आहे. जिल्ह्यासाठी ३४ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मागच्या वर्षीच्या जागेवरच नव्याने झाडे लावून उद्दिष्टपूर्ती केली जात आहे.विभागीय कार्यालय परिसरात दोन वर्षापूर्वी आणि वर्षभरापूर्वी मोठ्या प्रमाणात झाडे लावल्यामुळे या ठिकाणी नवीन झाडे लावण्यासाठी जागा शिल्लक राहायला नको होती. परंतु, जुनीच झाडे जगली नसल्याने पुन्हा एकदा वृक्षारोपणासाठी या जागेची निवड करण्यात आली आहे. त्याची तयारीही सुरु झाली आहे. विभागीय कार्यालय परिसरात जेसीबी मशीन सहाय्याने खड्डे केले जात आहेत. काही दिवसांमध्ये याच ठिकाणी पुन्हा नव्या उत्साहाने वृक्षारोपण केले जाईल. वृक्षारोपणाचे फोटो काढले जातील. परंतु, जुनी झाडे का जगली नाहीत, हा प्रश्न मात्र अनुत्तरित करणाराच आहे.केवळ ट्रीगार्ड राहिले शिल्लकएस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालय परिसरात दोन वर्षापासून वृक्षारोपण केले जात आहे. २०१६ मध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते त्यानंतर २०१७ मध्ये तत्कालीन विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांच्या हस्तेही याच ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आणि आता पुन्हा नव्याने खड्डे खोदून वृक्षारोपण करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच जागेवर किती झाडे लावणार? असा प्रश्नही निर्माण होत आहे. झाडे लावण्याबरोबरच झाडे जगविण्याची जबाबदारी घेतली असती तर आज प्रशासनाला झाडे लावण्यासाठी जागा शोधावी लागली असती. परंतु, जुनी झाडे न जगल्याने त्याच त्या जागेवर झाडे लावून केवळ सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचे दिसत आहे.६४ टक्के जगली झाडेराज्य शासन दरवर्षी पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड मोहीम राबवून प्रत्येक जिल्ह्याला आणि जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देते. या उद्दिष्टाअंतर्गत दरवर्षी जिल्ह्यात लाखो झाडे लावली जात आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात ७ लाख २२ हजार झाडे लावली लावली होती. त्यापैकी ६४ टक्के झाडे जगल्याची माहिती वन व सामाजिक वनीकरण विभागाने दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली आहे. कागदोपत्री अहवालात झाडे जगल्याचे दाखविले असले तरी प्रत्यक्षात मात्र शहर आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी लावलेली झाडे जगल्याचे दिसत नाही.दोन वर्षांत ९ लाख वृक्षारोपण२०१६ मध्ये राबविलेल्या २ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्याला २ लाख ८४ हजार ४८० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. जिल्ह्यातील ३७ विभागांनी २ हजार ६१० ठिकाणावर वृक्षांची लागवड करुन उद्दिष्ट पूर्ण केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ७ लाख ३२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. तेही जिल्ह्याने पूर्ण केले. त्यामुळे दोन वर्षात ९ लाख झाडे जिल्ह्यात लावली असून यावर्षी ३२ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार