शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

परभणी जिल्हा: हमीभाव केंद्रांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:54 IST

शेतमालाला रास्तभाव मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने सुरु केलेल्या हमीभाव योजनेंतर्गत जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांची मात्र अडचण होत आहे. एकीकडे नोंदणीच्या किचकट प्रक्रियेतून शेतकºयांना जावे लागत असल्याने थेट खुल्या बाजारात शेतमालाची विक्री करुन दिवाळीचा सण साजरा करण्याची तयारी शेतकºयांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतमालाला रास्तभाव मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने सुरु केलेल्या हमीभाव योजनेंतर्गत जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांची मात्र अडचण होत आहे. एकीकडे नोंदणीच्या किचकट प्रक्रियेतून शेतकºयांना जावे लागत असल्याने थेट खुल्या बाजारात शेतमालाची विक्री करुन दिवाळीचा सण साजरा करण्याची तयारी शेतकºयांनी केली आहे.यावर्षी परभणी जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी झाला असला तरी खरीप हंगामामध्ये जेमतेम उत्पादन शेतकºयांना झाले आहे. उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतकºयांच्या पदरात दोन पैसे पडावेत, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकºयांच्या आशेवर मात्र पाणी फेरले जात आहे. खरीप हंगामामध्ये मूग हे पहिले पीक साधारणत: दोन महिन्यांपूर्वीच बाजारात आले. त्यानंतर उडीद आणि सोयाबीन ही पिकेही हाती आली आहेत; परंतु, शासनाचे हमीभाव खरेदी केंद्रच जिल्ह्यात सुरु झाले नसल्याने शेतकºयांची अडचण होत आहे. मुगाची विक्री तर खुल्या बाजारात करण्यात आली. शेतकºयांच्या अपेक्षा सोयाबीन या पिकावर असतात. मागील काही वर्षांपासून नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. त्यामुळे या पिकावर शेतकºयांच्या आशा असतात. उत्पादित झालेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा. किमान शासनाने जाहीर केलेला हमीभाव तरी मिळेल, या उद्देशाने आर्थिक गणिते लावली जातात; परंतु, बाजारपेठेत चित्र उलटेच निर्माण होत आहे. सोयाबीन बाजारात आले की भाव गडगडतात आणि हमीभाव केंद्रांचाही पत्ता नसतो. त्यामुळे प्रति क्विंटलमागे हजार ते दीड हजार रुपयांचे नुकसान शेतकºयांना सहन करावे लागत आहे.परभणी जिल्ह्यामध्ये सहा हमीभाव केंद्र सुरु करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. महिनाभरापूर्वी हमीभाव केंद्रासाठी अर्ज मागविण्यात आले. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे; परंतु, अजूनही हमीभाव केंद्र सुरु झाले नाहीत. जिल्हा प्रशासनामार्फत शेतकºयांकडून खरेदीसाठी नोंदणी केली जात आहे. या नोंदणीलाही शेतकºयांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. दिवाळी तोंडावर येऊन ठेपली असून सोयाबीन विक्रीतून येणाºया पैशांमध्ये दिवाळीचा सण साजरा करण्याचे नियोजन शेतकºयांनी केले आहे. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री झालेल्या मालाचा पैसा हाती येण्यास किमान दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन शेतकºयांनी खुल्या बााजारपेठेतच शेतमाल विक्री करण्यावर भर दिला आहे. शासनाने वेळेत हमीभाव केंद्र सुरु केले असते तर शेतकºयांना त्याचा फायदा झाला असता. आताही वेळ गेलेली नसून हमीभाव खरेदी केंद्र तातडीने सुरु करावेत, अशी मागणी होत आहे.सहा ठिकाणी होणार खरेदी केंद्र४जिल्ह्यात नाफेडमार्फत परभणी, जिंतूर, सेलू, पालम, पाथरी आणि पूर्णा अशा सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले जाणार आहेत. तर विदर्भ को. आॅप .फेडरेशनच्या वतीने गंगाखेड आणि मानवत या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या खरेदी केंद्रावर ९ सप्टेंबरपासून शेतमाल विक्रीसाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. या नोंदणीला १५ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यानंतरच प्रत्यक्षात हमीभाव खरेदी केंद्र सुरु होतील, अशी शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी त्वरित हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावेत, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.४हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणच्या कागदपत्रांची पूर्तताही झाली आहे. शेतकºयांची नोंदणी आणि खरेदी एकाचवेळी सुरु करावी, असे निर्देश शासनाने दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत. त्यामुळे या निर्देशानुसार येत्या एक-दोन दिवसांत हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले जातील, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कापुरे यांनी दिली.\३८०० शेतकºयांची नोंदणी४जिल्ह्यातील पाच केंद्रावर २२ आॅक्टोबरपर्यंत ३ हजार ८६० शेतकºयांनी हमीभावाने शेतमाल विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये परभणीच्या केंद्रावर ८२५, जिंतूर ९२५, सेलू १५४५, पालम ४७० आणि पूर्णा येथील खरेदी केंद्रावर ९५ शेतकºयांची नोंदणी झाली आहे. हमीभाव केंद्रांसाठी शेतकºयांचा अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे या नोंदणीवरुन दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती