शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:50 IST

जिल्ह्यातील शेतकºयांच्या प्रश्नावर १९ रोजी काढला जाणारा मोर्चा हाणून पाडण्यासाठी सरकारच्या दबावातून पोलीस प्रशासन शिवसैनिकांना नोटिसा पाठवत आहे. मात्र या नोटिसांना न घाबरता शेतकरी व शिवसैनिकांनी स्वाभिमानाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शेतकºयांच्या प्रश्नावर १९ रोजी काढला जाणारा मोर्चा हाणून पाडण्यासाठी सरकारच्या दबावातून पोलीस प्रशासन शिवसैनिकांना नोटिसा पाठवत आहे. मात्र या नोटिसांना न घाबरता शेतकरी व शिवसैनिकांनी स्वाभिमानाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले आहे.पोलीस प्रशासनाने शिवसैनिकांना पाठविलेल्या नोटिसांच्या अनुषंगाने 'लोकमत'शी बोलताना खा. जाधव म्हणाले की, जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून शेतकºयांची अडवणूक केली जात आहे. नऊ वर्षात पहिल्यांदाच धरणात मूबलक पाणीसाठा असतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने खरीपापाठोपाठ रब्बी हंगाम देखील हातचा जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. महावितरणने साडेचार हजार कृषी पंपाचे नवीन वीज कनेक्शन दिलेले नाही. महावितरणच्या अडवणुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला असून शेतकºयांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे.मात्र सरकारच्या दबावापोटी पोलीस प्रशासन शिवसैनिकांना नोटिसा पाठवून भीती निर्माण केली जात आहे. त्यामुळे आपण सदैव शेतकºयांच्या पाठिशी उभे असून कोणीही घाबरु नये, मी स्वत: सर्वांच्या पुढे असेल, तेव्हा शेतकºयांनी नोटिसांना न घाबरता स्वाभिमानाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले आहे.