शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन कोटी रुपयांची मशीन धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:13 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागात रुग्णांच्या रक्त चाचण्यांसाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन राज्य शासनाने अ‍ॅटोमॅटिक ईलायझा मशीन उपलब्ध करुन दिली असताना केवळ कीट अभावी ही मशिन दोन वर्षापासून धूळखात पडून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागात रुग्णांच्या रक्त चाचण्यांसाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन राज्य शासनाने अ‍ॅटोमॅटिक ईलायझा मशीन उपलब्ध करुन दिली असताना केवळ कीट अभावी ही मशिन दोन वर्षापासून धूळखात पडून आहे.परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. मराठवाड्यातील जिल्ह्याच्या ठिकाणचे हे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. या जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस राज्य शासनाचा आहे. रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्त चाचण्या करुन अहवाल येण्यासाठी अधिक वेळ लागतो. एखाद्या रुग्णाला तातडीच्या उपचाराची गरज असते. मात्र रक्त चाचणीच्या अहवालामुळे त्या रुग्णावरील उपचारास विलंब होतो. परिणामी अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. रक्त चाचण्यांच्या अहवालामुळे रुग्णांवर उपचारासाठी विलंब होऊ नये, यासाठी राज्य शासनाने २०१६ मध्ये तब्बल २ कोटी रुपये खर्च करुन अ‍ॅटोमॅटिक ईलायझा मशीन खरेदी करुन जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये उपलब्ध करुन दिली. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या मलेरिया, कावीळ बी, कावीळ सी, एचआयव्ही यासह गुप्त रोग चाचण्या वेळेत पूर्ण होऊन मशीनमधून येणाºया अहवालानुसार डॉक्टरांना उपचार करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा रुग्णांसह डॉक्टरांना होती. मात्र येथील जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे गेल्या दोन वर्षापासून या मॅशीनची पॅकिंगच उघडलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना अत्याधुनिक मशीनद्वारे उपचाराला मुकावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने लक्ष देऊन अ‍ॅटोमॅटिक ईलायझा मशीन तत्काळ कार्यान्वित करुन रुग्णांसाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी रुग्णांमधून होत आहे.लोकप्रतिनिधींचे झाले दुर्लक्षजिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन, एक्स-रे मशीन, औषधींचा तुटवडा, डॉक्टरांचे रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष, रुग्णालय परिसरातील सुविधा आदी समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून निर्माण झाल्या आहेत. मात्र या समस्या सोडविण्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच गेल्या दोन वर्षापासून मलेरिया, कावीळ बी, कावीळ सी , एडस् व गुप्तरोग या महत्त्वाच्या रक्तचाचण्यांसाठी असलेली अ‍ॅटोमॅटिक ईलायझा मशीन धूळखात पडून आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे लक्षच गेले नाही. लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासनाचाही याकडे कानाडोळा झाला आहे.केवळ कीट अभावी बंद आहे मशीनजिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागात कोट्यवधी रुपये खर्च करुन उपलब्ध करुन दिलेल्या मशीनला कीटची आवश्यकता असते. ती कीटच मशिन सोबत उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे ही मशिन सुरू होऊ शकली नाही. मशिनसाठी आवश्यक असलेले कीट मिळावे, यासाठी आरोग्य विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र कीट उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून केवळ कीट अभावी ही मशीन बंद आहे. वरिष्ठस्तरावरुन या मशीनसाठी लागणाºया कीट उपलब्ध झाल्यास तत्काळ मशीन कार्यान्वित करण्यात येईल, असे रक्तपेढी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.मेट्रो ब्लड बँकेचा वापर बेडसाठीचयेथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २०११ मध्ये मेट्रो रक्तपेढीच्या इमारत उभारणीचे काम सुरु करण्यात आले होते. त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन २०१७ मध्ये या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या इमारतीच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उद्घाटन झाल्यानंतर रुग्णांच्या सोयीसाठी या इमारतीचा वापर होईल, अशी अपेक्षा रुग्णांना होती. मात्र या ब्लड बँकेचे उद्घाटन होऊनही मुख्य दरवाजा आजही बंद आहे. मोठ्या थाटामाटात उद्घाटन करुन मेट्रो ब्लड बँकचा वापर केवळ रक्तदानासाठीच केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल