शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ११ बीएलओंना दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:16 IST

भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २३ व २४ फेब्रुवारी रोजी मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रावर गैरहजर आढळून आलेल्या ११ बीएलओंना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २३ व २४ फेब्रुवारी रोजी मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रावर गैरहजर आढळून आलेल्या ११ बीएलओंना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.निवडणूक आयोगाच्या वतीने २३ व २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने सर्व बीएलओंना मतदान केंद्रावर हजर राहण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी आदेश दिले होते. तसेच राजकीय पक्षांनाही याबाबत अवगत करण्यात आले होते.या अनुषंगाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, उपविभागीय अधिकारी सूचिता शिंदे, परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर, विभागीय पोलीस अधिकारी संजय परदेसी यांनी २४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रांना भेटी दिल्या. त्यावेळी बाभळी येथील बीएलओ एस.एस.सुरवसे, पिंपरी येथील व्ही.आर. बोरसे, वरपूड येथील रणवीर मारोती, पिंपरी देशमुख येथील एस.ए. लोखंडे, के.एम. बनसोडे, ताडलिमला येथील एन.डी. कदम, पोरजवळा येथील एम.एम. काळे, पिंगळी येथील निलपत्रेवार, शेंद्रा येथील फुलारी, कासलवार, बलसा येथील बीएलओ सोनाजी गायकवाड हे ११ बुथलेव्हल एजंट गैरहजर आढळून आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी सर्व गैरहजर बीएलओंना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून तातडीने खुलासा मागवून घ्यावा, असे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आदेशित केले. तसेच गैरहजर बीएलओंवर कडक कारवाई करा, असेही आदेशित केले. यावेळी विविध पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.शनिवार, रविवार पुन्हा विशेष मोहीम४मतदार नोंदणीसाठी २ व ३ मार्च रोजी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष नोंदणी मोहीम घेण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, हे तपासून घ्यावे. तसेच मतदार नोंदणीचा नमुना ६ अर्ज भरुन द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी केले आहे. विशेष मोहिमेच्या दिवशी सर्व मतदार केंद्रावर बीएलओ हजर राहणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूक