शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मतदान यंत्राविषयीच्या शंकांचे प्रशासन करणार निरसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:11 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून, मतदान यंत्र आणि प्रथमच निवडणुकांत वापरल्या जाणाऱ्या व्हीव्हीपॅटविषयी मतदारांच्या काही शंका असतील तर त्याचे निरसन केले जाणार आहे. यासाठी रुट प्लॅन आखला असून, जिल्ह्यात दहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून, मतदान यंत्र आणि प्रथमच निवडणुकांत वापरल्या जाणाऱ्या व्हीव्हीपॅटविषयी मतदारांच्या काही शंका असतील तर त्याचे निरसन केले जाणार आहे. यासाठी रुट प्लॅन आखला असून, जिल्ह्यात दहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पी. शिवशंकर म्हणाले, आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली असून, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण, प्रसार, प्रचार केला जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे याबाबत मतदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण व्हावी यासाठी प्रभावी जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.ही जनजागृती मोहीम राबविण्यासाठी रुटप्लॅन तयार करण्यात आला आहे. तसेच प्रशिक्षण आणि प्रसारासाठी १० पथकांची स्थापना करण्यात आली आहे.पाथरी विधानसभा मतदार संघात ४, गंगाखेड ३, जिंतूर २ आणि परभणी मतदार संघात एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शहरी भागात शक्यतो मतदान केंद्रनिहाय प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनवर पिवळ्या रंगाचे स्टीकर लावून प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक पथकामध्ये पाच कर्मचाºयांचा समावेश असून, पथकासोबत पोलीस बंदोबस्तही दिला जाणार आहे. नागरिकांना आवाहन करण्यासाठी एक कर्मचारी, नोंदवहीत स्वाक्षरी घेण्यासाठी एक, प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी एक आणि मतदान झालेल्या चिठ्ठ्यांची प्रत्यक्ष मोजणी करण्यासाठी एका कर्मचारी नियुक्ती केली असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका एकत्रित घेण्याचा निर्णय झाला तरीही जिल्हा निवडणूक विभाग सज्ज असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. निवडणूक विभागाच्या सूचनेनंतरच प्रत्यक्ष जनजागृतीला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकGovernmentसरकार