शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : इमारत हस्तांतरित होत नसल्याने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:47 IST

जायकवाडी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेत उपजिल्हाधिकारी कार्यालय सुरू असून ही इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुुरुस्त करण्याची आवश्यकता असतांना या इमारतीचे शासकीय बांधकाम विभागाकडे हस्तांतरण झाले नसल्याने दुरुस्ती कोणी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जायकवाडी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेत उपजिल्हाधिकारी कार्यालय सुरू असून ही इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुुरुस्त करण्याची आवश्यकता असतांना या इमारतीचे शासकीय बांधकाम विभागाकडे हस्तांतरण झाले नसल्याने दुरुस्ती कोणी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.पाथरी शहरातील कारखाना परिसरात जायकवाडी विभागाची जुनी इमारत आहे. पूर्वी या इमारतीमध्ये जायकवाडीचे विश्रामगृह सुरू होते. कालांतराने ही इमारत ग्रामीण रुग्णालयाच्या वापरासाठी देण्यात आली. त्यानंतर पाथरी शहरात ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन स्वतंत्र इमारत तयार झाल्यानंतर हे रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे ही विश्रामगृहाची इमारत रिकामी झाली. २०१३ मध्ये पाथरी, मानवत व सोनपेठ या तीन तालुक्यांसाठी उपविभागीय कार्यालयास मंजुरी मिळाली; परंतु, जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर जायकवाडी विभागाने १४ आॅक्टोबर २०१३ रोजी ही इमारत उपविभागीय कार्यालय पाथरी यांना हस्तांतरित केली. सध्या ही ४० वर्षाची जुनी इमारत धोकादायक बनली आहे. तरी सुद्धा या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित आहे. धोकादायक इमारत दुरुस्त करण्यात यावी, यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी पत्र देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली होती. मात्र जायकवाडी विभागाकडील ही इमारत बांधकाम विभागाकडे अद्यापही स्थलांतरित झाली नाही. त्यामुळे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.पावसाळ्यात धोका शक्यच्जायकवाडी विभागाच्या अख्यत्यारीत असलेल्या जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीत सुरू असलेल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ३ एकर परिसरात विस्तारलेली आहे.च्मात्र या इमारतीचे बांधकाम होऊन जवळपास ४० वर्षे उटले आहेत. त्यामुळे ही इमारत धोकादायक बनली आहे. अनेक ठिकाणी छताचे प्लास्टर निखळून पडले आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात या इमारतीतून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीRevenue Departmentमहसूल विभाग