शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: पार्किंग व्यवस्था नसल्याने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:25 IST

शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर वाहनतळाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या राहणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. परिणामी किरकोळ वादाचे प्रकार घडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर वाहनतळाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या राहणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. परिणामी किरकोळ वादाचे प्रकार घडत आहेत. बँकांसमोर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बँकांनी वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गंगाखेड शहरात भारतीय स्टेट बँक, आयडीबीआय, जुनी हैदराबाद बँक, बँक आॅफ महाराष्ट्रा, युको बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, सिडिंकेट, महाराष्ट्र ग्रामीण इ. राष्ट्रीयीकृत बँका आहेत. या बँकांबरोबर पतसंस्था व होमलोनचे कार्यालये भाडे करारावर घेतलेल्या इमारतीत आहेत. या बँका व पतसंस्थांची कार्यालये व्यापारपेठेतील मुख्य रस्त्यावर असून या भागात वाहनतळाची व्यवस्था नाही. त्यामुळे बँकांमध्ये कामानिमित्त येणाºया ग्राहकांची वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त लावली जातात. परिणामी, वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनधारकांमध्ये किरकोळ वादविवाद होत आहेत.मुख्य रस्त्यावर असलेल्या बँका आणि पतसंस्थांनी वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नगरपालिकेचे दुर्लक्ष४शहरात बांधल्या जाणाºया मोठ्या इमारती व व्यापारी संकुलाचे बांधकाम करुन विविध कार्यालये व बँकांसाठी भाडेतत्त्वावर दिले जातात; परंतु, या इमारतींकडे स्वतंत्र पार्किंग व्यवस्था अस्तित्वात नसते. त्यामुळे इमारतीच्या बाजूला असलेल्या मुख्य रस्त्यावरच वाहनधारक आपली वाहने लावतात. परिणामी, वाहतुकीचा प्रश्न निर्माण आहे. नगरपालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTrafficवाहतूक कोंडीParkingपार्किंग