शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘जलयुक्त’ला उदासिनतेचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:57 IST

राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात ५८२ गावांमध्ये कामे प्रस्तावित करण्यात आली़ ४ टप्प्यात राबविलेल्या या योजनेत २१८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, प्रत्यक्षात वर्षनिहाय ८३ कोटी २२ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ १० हजार ९०७ कामे प्रस्तावित केली होती़ त्यापैकी ८ हजार ४५७ कामे पूर्ण झाली आहेत़ अनेक कामे अजूनही रखडल्याने योजनेला उदासिनतेचा फटका बसला आहे़

 लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात ५८२ गावांमध्ये कामे प्रस्तावित करण्यात आली़ ४ टप्प्यात राबविलेल्या या योजनेत २१८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, प्रत्यक्षात वर्षनिहाय ८३ कोटी २२ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ १० हजार ९०७ कामे प्रस्तावित केली होती़ त्यापैकी ८ हजार ४५७ कामे पूर्ण झाली आहेत़ अनेक कामे अजूनही रखडल्याने योजनेला उदासिनतेचा फटका बसला आहे़सिमेंट नाला कामात दगडांचा वापरजिंतूर तालुक्यातील मांडवा येथे सिमेंट नाला बांध कामामध्ये दगडांचा वापर केल्याची बाब तपासणीत उघड झाली़ त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे़ या कामासाठी ४० लाख ९ हजार ४१९ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला; परंतु, कामात मात्र मोठे दगड वापरण्यात आले़ तसेच निकृष्ट दर्जाची वाळू वापरली़ परिणामी या सिमेंट नाला बांधात पाणी अडण्याची शक्यता कमी झाली असून, कामातील गैरप्रकार उघड पडला आहे़जलयुक्त शिवारकामेजलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जूने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध/ के.टी. वेअरदुरुस्ती व नुतनीकरण, जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्तोत्र बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे हाती घेण्यात आली.जलयुक्त शिवार योजने अंतर्गत कामे गतीने पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक विभागाच्या अंतर्गत कामांच्या निविदा काढून काम करण्याचे आदेश दिले. काही भागात स्थानिक वादामुळे रखडलेली कामे वाद मिटवून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला़-विजयकुमार पाटीलप्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीआमच्या गावात १ कोटी २० लाख रुपयांची ६ बंधारे बांधण्यात आली़ मात्र ही सर्व बंधारे बोगस झाली़ अनेक बंधाऱ्यांना तडे गेले आहेत़ पाणी साचून राहत नाही़ या विषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती़ चौकशी अंती हे बंधारे बोगस असल्याचे स्पष्ट झाले़- श्रीकांत देवडे, साडेगाव

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकारIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प