शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:55 IST

शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मानकेश्वर परिसरात चक्क मुरमाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. हे वृक्ष आठ दिवसही टिकू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मानकेश्वर परिसरात चक्क मुरमाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. हे वृक्ष आठ दिवसही टिकू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे.जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिमंडळांतर्गत वडाळी नियतक्षेत्रांतर्गत मानकेश्वर परिसरातील किन्ही रस्त्यावर सर्वे नंबर ७२ मध्ये २५ हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्यात आले आहेत. वृक्ष लावण्यासाठी खोदण्यात आलेले हे खड्डे महाराष्ट्रातील निकृष्ठ खड्डे खोदण्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. जेसीबीचे खोरे ओरबडून अर्ध्या फुटांपेक्षाही कमी खोल चर सीसीटीसारखे काढून त्यातून निघालेल्या मुरूमामध्ये ही झाडे लावण्यात आली आहेत.दगड-माती, लाल माती यांच्यात लावलेली झाडे किती दिवस टिकतील हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे विभागीय वन अधिकारी यांनी ज्या दिवशी या भागाला भेट दिली, त्याच दिवशी वृक्ष लागवडीचा नमुना पहावयास मिळाला. वृक्ष लागवडीसाठी कुठलेही नियोजन नाही. शासकीय कार्यक्रम आहे याच धर्तीवर वृक्षलागवड करून कोट्यवधी रुपयांचा मलिदा वन विभाग फस्त करीत आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.यंत्रांनी केले लागवडीसाठी खड्डे४वृक्ष लागवडीसाठी मजुराच्या हाताने खड्डे करणे गरजेचे असताना जेसीबीच्या साह्याने कोणतेही निकष न पाळता केवळ जमीन ओरबाडून वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे ही वृक्ष लागवड औटघटकेची ठरणार असून शासनाने केलेल्या खर्च पूर्णपणे वाया जाणार आहे.४या प्रकाराची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. त्याच बरोबर वृक्ष लागवडीसाठी काळ्या मातीचा वापर होणे गरजेचे असताना लावलेल्या वृक्षावर वरच्या बाजूने काळी माती टाकून देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न वन विभागाचा आहे.४विशेष म्हणजे २० ते २५ ट्रॅक्टर काळी माती असूनही २५ ते ३० ट्रॅक्टर पांढरा मुरूम आणून टाकण्यात आला आहे. त्यामुळे शासन पैसे खर्च करीत असले तरी अधिकारी मात्र स्वत:चे चांगभले करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे.४वृक्ष लागवड करीत असताना भविष्यात वृक्ष वाढविण्यासाठी पाण्याची गरज असते. मात्र वनविभागाकडून डोंगरावर लावलेल्या वृक्षासाठी कुठलीही सिंचनाची व्यवस्था केलेली नाही. मुरमाड जमीन असल्याने झाडांना आठ दिवसात पाणी मिळाले नाही तर हे वृक्ष राहतील की, नाही? याबाबत साशंकता आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात जनावरे असल्याने वृक्ष लागवड ची सुरक्षा कशी होणार हा प्रश्न आहे.या प्रकरणात करण्यात आलेली कामे किती दर्जेदार आहेत, याची पाहणी सुरू असून बोगस कामे करणाºयांवर कार्यवाही करून व संबंधित कामाचीही चौकशी करण्यात येईल.-विजय सातपुते, उपविभागीय वन अधिकारी, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीforest departmentवनविभाग