शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : एमआयडीसी संदर्भात १५ दिवसांत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:03 IST

परभणीपासून जवळच असलेल्या बाभळगाव परिसरात प्रस्तावित केलेल्या नवीन एमआयडीसी संदर्भात येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत, अशी माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणीपासून जवळच असलेल्या बाभळगाव परिसरात प्रस्तावित केलेल्या नवीन एमआयडीसी संदर्भात येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत, अशी माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़मुंबई येथे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक पार पडली़ यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आ़ डॉ़ राहुल पाटील, उद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ रमेश सुरवाडे, भूसंपादन महाव्यवस्थापक गोपीनाथ ठोंबरे, प्रादेशिक अधिकारी संजय कोतवाड, क्षेत्रीय व्यवस्थापक एम़ आऱ महाडिक, उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे, उद्योजक प्रतिनिधी ओमप्रकाश डागा, गोविंद अजमेरा, शेतकरी प्रतिनिधी दौलतराव मस्के, मुसा रज्जाक पटेल आदींची उपस्थिती होती़ यावेळी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सांगितले की, परभणी येथे मागील ५० वर्षांपासून १०० हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी अस्तित्वात असून, या ठिकाणी केवळ लघु सुक्ष्म उद्योग व्यवसाय कसे बसे उभे आहेत़ सद्यस्थितीत जिल्ह्याच्या आर्थिक विकास व रोजगार निर्मितीसाठी मोठे उद्योग उभारणे गरजेचे आहे़ परभणी जिल्ह्यात उत्पादित होत असलेल्या शेतमालावर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग उभारून विकासाला चालना देण्यासाठी आपण पुढाकार घेऊन उद्योगमंत्र्यांकड आग्रही मागणी केली़ काही दिवसांपूर्वी परभणीला टेक्सस्टाईल पार्क घोषित होवूनही केवळ जागेअभावी हा प्रकल्प उभारणीस अडचणी निर्माण झाल्या आहेत़ त्यामुळे बाभळगाव परिसरातील जमिनी उपलब्ध करून देण्याबाबत शेतकºयांनी होकार दिला आहे़ या बैठकीत मोबदला देण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली़ बाभळगाव येथील ३०० हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात येणार असून, शेतकºयांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले आहे़ तेव्हा एमआयडीसी संदर्भात येत्या १५ दिवसांत योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश सुभाष देसाई यांनी अधिकाºयांना दिले़