शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दबलेल्या रस्त्याची कंत्राटदाराकडून दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:47 IST

पुर्णा ते लक्ष्मीनगर यादरम्यानचा १९ कोटी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता दबल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबधित कंत्राटदाराने तातडीने या रस्त्याची डागडूगजी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): पुर्णा ते लक्ष्मीनगर यादरम्यानचा १९ कोटी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता दबल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबधित कंत्राटदाराने तातडीने या रस्त्याची डागडूगजी केली आहे.सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झालेला लक्ष्मीनगर ते पूर्णा हा रस्ता जागोजागी दबला होता. दबलेल्या रस्त्यामुळे सुसाट वेगात असलेल्या वाहनातील प्रवाशांना गचक्यांचा त्रास सहन करावा लागत होता. विशेष बाब म्हणजे, या रस्त्यावरील नव्याने बांधकाम केलेल्या नळकांडी पुलावर अधिक रस्ता दबला होता. केंद्रीय रस्ते निधीतून या रस्त्याच्या १०.६ कि.मी. कामासाठी शासनाकडून १९ कोटी ६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान स्वरुपाची खड्डे होते. तसेच अनेक भागात रस्ता दबला होता.रस्त्यावरील गचक्यांमुळे वाहनचालकांना शारीरिक इजा व लहान अपघातांनाही सामोरे जावे लागत होते. वाहनचालकांची होणारी अडचण लक्षात घेता १४ आॅक्टोबर रोजी ‘सहा महिन्यातच दबला रस्ता’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होेते.या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार संबधित कंत्राटदाराकडून रस्त्याची वरवरून मलमपट्टी करण्यात येत आहे. यामुळे वाहनधारकांना तात्पुरत्या स्वरुपाचा दिलासा मिळाला असला तरी नव्याने बांधकाम केलेल्या नळकांडी पुलावरील रस्ता दबलेलाच दिसत आहे. भविष्यात या नळकांडी पुलाचा भाग कायमस्वरुपी चांगला राहिल की नाही? याबाबत शंका आहे.पूर्णा-नांदेड : रस्त्यावर खड्डेच खड्डे४पूर्णा-परभणीकडे जाणाºया रस्त्याच्या नुतनीकरणानंतर या रस्त्याचा प्रश्न निकाली लागला असला तरी पूर्णा ते नांदेड या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील काही भाग वगळता रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती झाली आहे. शहरापासूनच खड्ड्यंना सुरुवात होत असून, हे खड्डे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दर वर्षी लाखो रुपये खर्च केले जातात; परंतु, काही महिन्यातच रस्त्यावरील खड्डे उघडे पडतात.४पूर्णा-झिरोफाटा रस्त्या प्रमाणे पूर्णा ते पिंपळगाव भत्यापर्यंत या रस्त्याचे नुतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. पूर्णा ते लक्ष्मीनगर या दहा कि.मी. रस्त्यासाठी तब्बल १९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यामुळे हा रस्ता दर्जेदार होईल, अशी अपेक्षा नाागरिकांमध्ये होती; परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाला दुुर्लक्षामुळे सहा महिन्यातच या रस्त्याचीही दुरस्ती करावी लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTrafficवाहतूक कोंडी