शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :मोफत प्रवेशाला थंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:25 IST

बालकांच्या मोफत शिक्षण कायद्या अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे़ ही प्रक्रिया सुरू होवून आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी केवळ ३३६ आॅनलाईन अर्जच दाखल झाले आहेत़ त्यामुळे याही वर्षी जागा रिक्त राहतात की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बालकांच्या मोफत शिक्षण कायद्या अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे़ ही प्रक्रिया सुरू होवून आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी केवळ ३३६ आॅनलाईन अर्जच दाखल झाले आहेत़ त्यामुळे याही वर्षी जागा रिक्त राहतात की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो़ यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये १० फेब्रुवारीपासून आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे़ या प्रवेशासाठी जिल्ह्यातील १५२ शाळांची निवड करण्यात आली आहे़ या १५२ शाळांमध्ये १ हजार ५०२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ या शाळांमधील जिंतूर तालुक्यातील १४ शाळांमध्ये ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ सोनपेठ तालुक्यात ११ शाळांमध्ये १५७, परभणी ग्रामीण भागातील १६ शाळांमध्ये १८४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ मानवत तालुक्यातील ९ शाळांमध्ये प्राथमिकच्या ५० विद्यार्थ्यांना तर पूर्व प्राथमिकच्या २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ तर पालम तालुक्यात ६ शाळांमध्ये ६६, पूर्णा तालुक्यातील १४ शाळांमध्ये ७४ तर सेलू तालुक्यामध्ये १३ शाळांमधील प्राथमिकच्या १३३ विद्यार्थ्यांना तर पूर्व प्राथमिकच्या १३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पाथरी तालुक्यातील ४ शाळांमध्ये प्राथमिकचे ३८ तर पूर्व प्राथमिकच्या १० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ परभणी शहरामध्ये ४४ शाळा असून, यामध्ये ३६२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ प्रवेश प्रक्रिया सुरू होवून आठ दिवसांचा कालावधी उलटत आला असून, आणखी एकच आठवडा आॅनलाईन नोंदणीसाठी आहे़ यातील निम्मा कालावधी उलटला असून, आतापर्यंत जिल्हाभरात ३३६ पालकांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे़ त्यामुळे सध्या तरी २५ टक्के प्रवेशासाठी थंड प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे़