शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गंगाखेड नगरपालिका उपनगराध्यक्षपदी कॉँग्रेसचे लव्हाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:47 IST

येथील उपनगराध्यक्षपदासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत कॉँग्रेसचे गोपीनाथ लव्हाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेला काँग्रेसचे ३ व रासपचे ३ असे ६ नगरसेवक गैरहजर राहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : येथील उपनगराध्यक्षपदासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत कॉँग्रेसचे गोपीनाथ लव्हाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेला काँग्रेसचे ३ व रासपचे ३ असे ६ नगरसेवक गैरहजर राहिले.गंगाखेड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे यांच्यावर नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी नगरपालिकेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात शनिवारी सकाळी १० ते १२ यावेळेत सभा घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी गोपीनाथ शिवाजी लव्हाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने उपनगराध्यक्षपदी लव्हाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी जाहीर केले.उपनगराध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान ज्योती चौधरी, स्मिताताई भालेराव, शेख तलत मुस्तफा, ज्योती शेट्टे, प्रतिभा सानप, अ‍ॅड.सय्यद अकबर, नंदिनीताई जाधवर, अ‍ॅड. शेख कलीम, चंद्रकांत खंदारे, अजिज खान, सावित्रीबाई गुडे, विमलबाई घोबाळे, नागनाथ कासले, मनिषा मस्के, विशाल साळवे, सीमाताई राखे, तुकाराम तांदळे, राजकुमार सावंत, सुनिल चौधरी आदी नगरसेवकांची उपस्थिती होती.पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी नानासाहेब कामटे, अनिल समिंद्रे यांनी सहकार्य केले. दरम्यान, उपनगराध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर कॉँग्रेस, राष्टÑवादी, भाजप व अपक्ष नगरसेवकांनी न.प. सभागृहापासून मिरवणूक काढली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उपनगराध्यक्ष निवडी दरम्यान कॉँग्रेस पक्षाचे गोपीनाथ लव्हाळे हे उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार असून सुद्धा कॉँग्रेस पक्षाच्या ८ नगरसेवकांपैकी शेख इस्माईल, राजश्री दामा, शैलाबाई ओझा हे तीन नगरसेवक अनुपस्थित राहिले. राष्टÑीय समाज पक्षाचे सत्यपाल साळवे, राजू पटेल, राधाकिशन शिंदे हेही अनुपस्थित राहिले. त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडीसाठी घेतलेल्या सर्वसाधारण सभेस ६ नगरसेवक गैरहजर होते. कॉँग्रेसचे नगरसेवक शेख इस्माईल हे नगरपालिका परिसरात असूनही सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, हे विशेष.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका