शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बोर्डीकर-वरपूडकर यांच्यात पुन्हा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:25 IST

जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेले माजीमंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षाच्या मैत्रीनंतर पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन संघर्ष होणार आहे. १५ मे रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होत असून एकाच पॅनलमधून निवडून आलेले हे दिग्गज आता मात्र एकमेकांच्या विरोधात आले आहेत.

अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेले माजीमंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षाच्या मैत्रीनंतर पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन संघर्ष होणार आहे. १५ मे रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होत असून एकाच पॅनलमधून निवडून आलेले हे दिग्गज आता मात्र एकमेकांच्या विरोधात आले आहेत.परभणी जिल्ह्याच्या राजकारणात माजीमंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर हे जवळपास गेल्या ३५ वर्षापासून सक्रिय आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही दिग्गजांनीही वेळोवेळी पक्षांतर केले आहे. शिवाय राजकारणातील चढउतारही अनुभवले आहेत. तब्बल १३ वर्षे एकमेकांच्या विरोधात राहिलेले वरपूडकर- बोर्डीकर हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तीन वर्षापूर्वी एकत्रित आले होते. त्यांनी तुळजाभवानी पॅनलच्या माध्यमातून २१ पैकी १७ सदस्य निवडून आणत बँकेवर एकहाती वर्चस्व मिळविले होते. त्यांच्याविरोधातील माजी आ.सुरेश देशमुख, आ.विजय भांबळे, आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या बँक बचाव पॅनलचे फक्त चार सदस्य निवडून आले होते. त्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर यांच्या पॅनलचे दिवंगत माजी आ.कुंडलिकराव नागरे यांची निवड झाली होती. नागरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम गेल्या महिन्यात जाहीर झाला होता. याच दरम्यान आ.बाबाजानी दुर्राणी यांना तक्रारीनंतर सदस्यत्वासाठी अपात्र ठरविल्याचा निर्णय सहकार विभागाचे प्रधान सचिव संधू यांनी दिला होता. या विरोधात आ.दुर्राणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर प्रधान सचिवांच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली होती. शिवाय जिल्हा बँकेची निवडणूक घेण्यासही स्थगिती देण्यात आली होती. नंतरच्या घडामोडीत न्यायालयाने ही स्थगिती उठवून अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता १५ मे रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी स्वत: माजीमंत्री सुरेश वरपूडकर हे इच्छुक आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीपासून तशी तयारीही चालविली आहे. दुसरीकडे माजी आ.बोर्डीकर हे भाजपात गेले असून त्यांनीही बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे मनपातील विरोधी पक्षनेते विजय जामकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे केल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरपूडकर विरुद्ध जामकर अशी अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची चर्चा आहे. असे असले तरी खरी लढत ही वरपूडकर विरुद्ध बोर्डीकर अशीच असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. ७ मे २०१५ रोजी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला होता. त्यावेळी एकत्रित गुलाल उडवून जल्लोष केलेले नेते, तब्बल तीन वर्षानंतर पुन्हा एकमेकांच्या विरोधात येत आहेत. विशेष म्हणजे यावेळेला वरपूडकर यांच्या बाजुला तीन वर्षापूर्वी त्यांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यामुळे ही निवडणूक कशी होते, याकडे परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बँकेचे २१ पैकी २० संचालक आहेत. एक जागा रिक्त आहे. २० पैकी वरपूडकर यांच्या गटात किती सदस्य राहतील व गेली अनेक वर्षे जिल्हा बँकेवर वर्चस्व ठेवून असलेले बोर्डीकर यांच्यागटात किती सदस्य राहतील, हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.दिग्गज मंडळी बँकेच्या संचालक मंडळातपरभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात दिग्गजांचा समावेश आहे. त्यामध्ये तीन माजी आमदार, एक माजीमंत्री, दोन विद्यमान आमदार, एक माजी जि.प.अध्यक्ष, तीन जि.प.सदस्य, एक मनपा सदस्य यांचा समावेश आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक ही अटीतटीची होण्याची शक्यता आहे.१३ वर्षानंतर आले होते एकत्रमाजीमंत्री वरपूडकर व माजी आ.बोर्डीकर हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तब्बल १३ वर्षानंतर एकत्र आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ मध्ये स्थापना झाल्यानंतर वरपूडकर हे राष्ट्रवादीत गेले होते. तर बोर्डीकर हे काँग्रेसमध्येच राहिले. नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये परतले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पाथरीच्या जागेवरुन वाद निर्माण झाल्यानंतर वरपूडकर यांनी राष्ट्रवादीचा त्याग करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर जवळपास ६ महिन्यांपूर्वी बोर्डीकर यांनी भाजपात प्रवेश केला. आता देश व राज्य पातळीवर काँग्रेस व भाजपा (परभणी पंचायत समितीचा अपवाद वगळून) एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. याच विरोधाची धार जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत परभणीकरांना अनुभवायास मिळते की काय? या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम असाजिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी १५ मे रोजी सकाळी ११.४५ ते १२.१० पर्यंत पीठासन अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करता येणार आहेत. दुपारी १२.२० ते १२.५० यावेळेत आलेल्या अर्जांची छाननी होणार आहे. दुपारी १२.५० ते १.२० यावेळेत इच्छुकांना अर्ज परत घेण्याची मुदत आहे. त्यानंतर आवश्यकता असल्यास मतदान घेण्यात येणार आहे. मतदानानंतर तातडीने निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकbankबँक