शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नुकसानीच्या पंचनाम्यात दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:13 IST

आठ दिवसांंपूर्वी अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिके आडवी झाली. प्रशासनाने या पिकांचे पंचनामे सुरू केले खरे. मात्र केवळ गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जात नसल्याने हा दुजाभाव का? असा सवाल शेतकºयांमधून केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आठ दिवसांंपूर्वी अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिके आडवी झाली. प्रशासनाने या पिकांचे पंचनामे सुरू केले खरे. मात्र केवळ गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जात नसल्याने हा दुजाभाव का? असा सवाल शेतकºयांमधून केला जात आहे.मागील आठवड्यात ११, १२ व १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यात जिंतूर, सेलू, पूर्णा, पालम आणि गंगाखेड तालुक्यामध्ये गारपीट झाली. तर परभणी तालुक्यात वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नोंद महसूलच्या अधिकाºयांनी घेतली आहे. दुसरीकडे अवकाळी पाऊस व वादळी वाºयामुळे झालेल्या नुकसानीकडे चक्क कानाडोळा करण्यात आला आहे. परभणी तालुक्यात गारपीट व वादळी वाºयाने रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, महसूल प्रशासनाने ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे त्या ठिकाणचेच पंचनामे केले आहेत.मात्र वादळी वाºयाने तालुक्यातील आर्वी, टाकळी कुंभकर्ण, शहापूर, तुळजापूर, कुंभारी बाजार, डिग्रस, मांडवा, कारला, काष्टगाव आदी गावातील गहू, ज्वारी ही पिके भूईसपाट झाली आहे. मात्र महसूल प्रशासनाने या पिकांचे अद्याप पंचनामे केले नाहीत. मोठा खर्च करून रबी हंगामात पेरणी केलेल्या शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळी वाºयाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने वाºयाने भूईसपाट झालेल्या पिकांचेही पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.