शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आचारसंहितेपूर्वीची घाई सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:11 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या तीन-चार दिवसांत लागू होण्याची कुणकुण असल्याने परभणीच्या शासकीय कार्यालयांमध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बिले मंजूर करुन घेण्याची घाई घडबड दिसून येत आहे. अधिकाऱ्यांचे कक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांमुळे फुल्ल झाल्याचे दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या तीन-चार दिवसांत लागू होण्याची कुणकुण असल्याने परभणीच्या शासकीय कार्यालयांमध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बिले मंजूर करुन घेण्याची घाई घडबड दिसून येत आहे. अधिकाऱ्यांचे कक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांमुळे फुल्ल झाल्याचे दिसत आहेत.आगामी काळात लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. एकीकडे निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय तयारी होत असताना दुसरीकडे आचारसंहितेपूर्वी बिले मंजूर करुन घेण्यासाठी घाई गडबड सुरु झाल्याचे दिसत आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये अनेक कामांना मंजुरी दिली जाते. विकासकामांसाठी निधी मंजूर होतो. मात्र या कामांसाठी प्रत्यक्षात प्रस्तावच वेळेत सादर होत नसल्याने आर्थिक वर्षाच्या शेवटी प्रस्ताव सादर करुन बिले मंजूर करुन घेतली जात असल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी २३ दिवस शिल्लक आहेत; परंतु, त्यापूर्वीच या बिलांना आचारसंहितेचा अडथळा निर्माण होऊ शकतो. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कामाची देयके मंजूर करता येत नाहीत. परिणामी निधी मंजूर असतानाही कामे रखडू शकतात. तसेच संपूर्ण मार्च महिना आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच कामांची बिले मंजूर करुन घेण्यावर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा भर दिसत आहे.जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयांवरील नियोजन विभागासह इतर विभागांमध्ये सध्या गर्दी दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये मंजूर झालेल्या कामांचे प्रस्ताव घेऊन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आहेत.मंजूर कामासाठी प्राधान्याने निधी मिळावा, यासाठी अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी गाव पुढारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आहेत. महत्त्वाच्या विभागातील अधिकाºयांच्या कक्षात बसून प्राधान्याने कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली जात आहे. रविवार आणि महाशिवरात्रीची सुटी असल्याने दोन दिवस कुठलेही शासकीय कामकाज झाले नाही.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ९ मार्चपर्यंत जाहीर होईल, असे संकेत अधिकारी- पदाधिकाºयांना मिळाले आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच उपलब्ध असलेल्या निधीमधून विकासकामांना प्रशासकीय मान्यता देणे, उपलब्ध निधी त्या त्या कामांसाठी वर्ग करणे आदी कामे सुरु झाली आहेत. तालुक्याच्या ठिकाणावरुन ग्रामीण भागातून कामे घेऊन येणाºया लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांची शासकीय कार्यालयात रेलचेल दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयातही अशीच स्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यामध्ये राजकीय पदाधिकाºयांना आता निवडणुकांचे वेध लागले आहेत.नियोजन समिती : १२२ कोटींचा निधी वितरितजिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमार्फत केल्या जाणाºया विकासकामांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीचा पुरवठा केला जातो. नियोजन समितीचा निधी चालू आर्थिक वर्षात खर्च करणे बंधनकारक आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर नियोजनचा निधीही वितरित करताना अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीतील कामांचा निधी मंजूर करुन घेण्यासाठीही घाई सुरु झाली आहे. एरव्ही मंजूर कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून वारंवार प्रस्ताव मागवूनही शासकीय यंत्रणा प्रस्ताव दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसत होते. मात्र यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी प्रस्ताव दाखल करुन घेण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे. नियोजन समितीच्या कार्यालयात अधिकाºयांबरोबरच राजकीय कार्यकर्त्यांचीही उठबस वाढली आहे. यावर्षी नियोजन समितीने १५१ कोटी २९ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला असून त्यापैकी १२२ कोटी १९ लाख ९४ हजार रुपये यंत्रणांना वितरित केले आहेत.१०५ कोटींचा कामांवर खर्चजिल्हा नियोजन समितीने आतापर्यंत १२२ कोटींचा निधी वितरित केला असून शासकीय यंत्रणांनी त्यापैकी १०५ कोटी ५ लाख रुपये कामांवर खर्चही केला आहे. त्यामुळे निधी वितरणाबरोबरच खर्चाचा वेगही वाढला आहे. नियोजन समितीने पर्यटन विकासामधून ४७.६७ लाख, पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी ६८.७० लाख, शासकीय इमारत बांधकामासाठी ७९.१७ लाख आणि दुधडेअरीसाठी १८.३० लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे या निधीतील आचारसंहितेचा अडथळा दूर झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकParliamentसंसद