शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: दहावीच्या परीक्षेत भरारी पथकांना सापडेनात कॉप्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:15 IST

जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात झाली असून, काही केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरू असताना शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या पथकांना मात्र कॉप्या सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात झाली असून, काही केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरू असताना शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या पथकांना मात्र कॉप्या सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १ मार्चपासून जिल्हाभरात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे़ जिल्ह्यातील ९५ केंद्रांवर ३१ हजार ८८९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत़ सोमवारी दहावीचा द्वितीय व तृतीय भाषा हिंदीचा पेपर होता़ यामध्ये २२ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ त्यापैकी २२ हजार ११३ विद्यार्थी उपस्थित होतो़ ८३२ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर राहिले़ ९५ केंद्रांवर ९५ बैठे पथक व ५५ भरारी पथके नियुक्त करण्यात आली असली तरी या पेपरला एकही कॉपी सापडली नाही़ विशेष म्हणजे तालुक्यातील पेडगाव येथील केंद्रांवर अधिक कॉप्या होत आहेत़ याशिवाय परभणी शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील केंद्रांवरही मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरू असताना शिक्षण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे़ परिणामी कॉपीमुक्त परीक्षेचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे़