शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहर:११ हजार खांबावर एलईडी दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:44 IST

शहरातील वीज खांबावर एलईडी दिवे बसविण्याचे कंत्राट एका एजन्सीने घेतले असून येत्या दोन महिन्यामध्ये ११ हजार ३०० खांबावर दिवे बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील वीज खांबावर एलईडी दिवे बसविण्याचे कंत्राट एका एजन्सीने घेतले असून येत्या दोन महिन्यामध्ये ११ हजार ३०० खांबावर दिवे बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.परभणी शहरातील वीज खांबावरील जुने दिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शहर महापालिकेने राज्य शासनाच्या एका एजन्सी समवेत नुकताच या संदर्भातील करार केला असून या एजन्सीमार्फत शहरातील पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.विशेष म्हणजे एलईडी पथदिवे बसविण्याबरोबरच पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही एजन्सीवर असल्याने महापालिकेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. परभणी शहरात ११ हजार ३०० विद्युत खांब असून या सर्व खांबावर एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच परभणी शहर एलईडी दिव्यांनी उजळणार आहे. विशेष म्हणजे, हे दिवे बंद आणि सुरु करण्यासाठी प्रत्येक खांबावर टायमर बसविले जाणार असून यातून विजेची मोठ्या प्रमाणात बचतही होणार आहे.महापौरांच्या हस्ते उद्घाटन४वीज खांबावर एलईडी दिवे बसविण्याच्या या कामाचे उद्घाटन नुकतेच महापौर मीनाताई वरपूडकर, सभागृहनेते भगवान वाघमारे यांच्या हस्ते झाले. दर्गारोडवरील हजरत सय्यद शाह तुराबूल हक दर्गा कमानीजवळ महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते विजय जामकर, नगरसेवक गुलमीर खान, विकास लंगोटे, अ‍ॅड.अमोल पाथरीकर, विशाल बुधवंत, मोईन मौलवी, अ‍ॅड. विष्णू नवले, मो. नईम, यांत्रिकी विभागाचे तन्वीर मिर्झा बेग, पाशा कुरेशी, रितेश जैन आदींची उपस्थिती होती. महापालिकेतील विद्युत विभागाचे ३० कर्मचारी यासाठी प्रयत्न करीत असून विद्युत विभाग व एजन्सी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून येत्या दोन महिन्यामध्ये सर्व पथदिवे बदलले जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका