शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

परभणी मंडळात १४ हजार ७९९ ग्राहकांचे विद्युत मीटर बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 19:35 IST

महावितरणची मोहीम; ५२ टक्के वीज गळती होत असल्याने निर्णय

ठळक मुद्देग्राहकांना जे नवीन मिटर देण्यात येत आहे़ ते पूर्णत: मोफत आहे़ वीज ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचा विरोध झालेला नाही

परभणी : परभणी मंडळांतर्गत ५२ टक्के वीज गळती होत असल्याने व ग्राहकांना योग्य, अचूक आणि मानवहस्तक्षेप विरहित वीज बिल देण्याच्या अनुषंगाने रेडिओ फ्रीक्वेन्सी डाटा युनिट (आरएफडीसीयू) या प्रणालीवरील वीज मिटर बसविण्याची मोहीम महावितरणच्या वतीने सुरु करण्यात आली असून आतापर्यंत परभणी शहरात १४ हजार ७९९ ग्राहकांचे मीटर बदलण्यात आले आहेत. 

वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना अचूक व मानवहस्तक्षेप विरहित वीज बिल देण्याच्या अनुषंगाने महावितरण कंपनीने अत्याधुनिक पद्धतीचे रेडिओ फ्रीक्वेन्सी डाटा युनिट (आरएफडीसीयू) मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या मीटरच्या माध्यमातून डाटा कान्स्ट्रेटर युनिट (डीसीयू) मशीनद्वारे थेट महावितरणच्या संगणकीय बिलिंग प्रणालीमध्ये ग्राहकांच्या मीटरची रिडिंग येते. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात आरएपीडीआरटी टाऊन मधील नांदेड परिमंडळातील २ लाख ५३ हजार ग्राहकांचे मीटर बदलण्याचे उद्दिष्ट महावितरणच्या वतीने ठेवण्यजात आले आहे. त्यानुसार राणीपूर (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातील मे.जिनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला हे मीटर बदलण्याचे काम देण्यात आले आहे.

या अंतर्गत परभणी शहरात ५२ टक्के वीज गळती असल्याने ही वीज गळती कमी करण्याच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेडिओ फ्रीक्वेन्सी डाटा युनिट (आरएफडीसीयू) मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे ग्राहकास त्याच्या वीज वापराप्रमाणे अचूक युनिटचे बिल देणे शक्य होणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. शहरात आॅगस्ट २०१९ पासून मीटर बदलण्याचे काम सुरु करण्यात आले असून या अंतर्गत ५२ हजार ३३९ ग्राहकांचे मीटर बदलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी जानेवारी २०२० पर्यंत निवडलेल्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून १४ हजार ७९९ ग्राहकांचे मीटर बदलण्यात आले असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली. 

ग्राहकांना मिळते मोफत मीटरमहावितरणच्या वतीने ग्राहकांना जे नवीन मिटर देण्यात येत आहे़ ते पूर्णत: मोफत आहे़. असे असतानाही काही ठिकाणी ग्राहकांकडून वीज मिटर बदलण्यासाठी पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या़ या तक्रारींच्या अनुषंगाने स्थानिक कार्यालयाकडून कारवाई झालेली नाही, अशी लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. असे असताना महावितरणच्या वतीने मात्र सर्व काही सुरळीत असल्याचे सांगण्यात आले़ योग्य, अचूक व मानव हस्तक्षेप विरहित वीज बिल येण्याच्या अनुषंगाने महावितरणकडून रेडिओ फ्रीक्वेन्सी डाटा युनिट (आरएफडीसीयू) मीटर बसविण्यात येत आहेत. हे मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना जादा वीज देयके आकारण्यात आलेली नाहीत. तसेच मीटर बदलण्यास वीज ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचा विरोध झालेला नाही, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे. 

माहिती देण्यास अधिकाऱ्यांचा नकारग्राहकांना बदलून देण्यात येणारे मिटर पूर्णत: मोफत आहेत का? असा प्रश्न महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांना रात्री ७़४५ च्या सुमारास भ्रमणध्वनीद्वारे विचारला असता, त्यांनी रात्री ८ वाजले आहेत, असे म्हणून फोन बंद केला़ त्यामुळे महावितरणची या संदर्भातील अधिकृत भूमिका समजू शकली नाही़ शिवाय महावितरणच्या हितार्थ माहिती देण्याबाबत अन्नछत्रे यांची उदासिनता दिसून आली़

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणparabhaniपरभणी