शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विषय समित्यांचे सभापती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:47 IST

येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह ६ विषय समित्या व तीन प्रभाग समितींच्या सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे गुरुवारी निश्चित झाले असून या संदर्भातील घोषणेची औपचारिकता १ फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह ६ विषय समित्या व तीन प्रभाग समितींच्या सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे गुरुवारी निश्चित झाले असून या संदर्भातील घोषणेची औपचारिकता १ फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे.महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह ६ विषय समित्या व तीन प्रभाग समितींच्या निवडणुकीची प्रक्रिया २९ जानेवारीपासून सुरु झाली. यासाठी २९ व ३० जानेवारी असे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वेळ देण्यात आला होता. २९ जानेवारी रोजी एकही अर्ज मनपाकडे आला नाही; परंतु, ३० जानेवारी रोजी स्थायी समिती सभापतीपदासाठी गुलमीर खाँ कलिंदर खाँ यांचा अर्ज दाखल झाला तर प्रभाग समिती ‘अ’ सभापतीपदासाठी राधिका शिवाजी गोमचाळे, प्रभाग समिती ‘ब’ साठी सय्यद समरीन बेगम फारुख व प्रभाग समिती ‘क’ साठी नम्रता संदीप हिवाळे यांचे अर्ज दाखल झाले. दलितवस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाजकल्याण सभापतीपदासाठी नागेश सोनपसारे यांचा अर्ज दाखल झाला. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी माधुरी विशाल बुधवंत यांचा तर स्थापत्य समितीसाठी गवळणताई रामचंद्र रोडे यांचा अर्ज दाखल झाला. वैद्यकीय व सहाय्य आरोग्य समितीच्या सभापतीसाठी अब्दुल कलीम अ.समद यांचा तर विधी समिती समितीसाठी अ‍ॅड.अमोल पाथरीकर आणि शहर सुधार समितीसाठी शेख फरहत सुलताना शेख अ.मुजाहेद यांचा अर्ज दाखल झाला. माध्यमिक व पूर्व माध्यमिक आणि तांत्रिक समिती सभापतीपदासाठी विकास लंगोटे यांचा अर्ज दाखल झाला. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, विरोधी पक्षनेते विजय जामकर, रविंद्र सोनकांबळे, सचिन देशमुख, अमोल पाथरीकर, नागेश सोनपसारे, गणेश देशमुख, इम्रान हुसैनी, फारुखबाबा, मुजाहेद शेख, बाळासाहेब बुलबुले, मो.नईम, विश्वजीत बुधवंत, अमोल जाधव आदींची उपस्थिती होती.राष्टÑवादी सत्तेत अन् विरोधी पक्षातही४महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. गेल्यावेळी काँग्रेसला विरोध करुन राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे घेतले होते. त्यानंतरच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस मनपाच्या सत्तेत सहभागी झाला.४आता सभापतीपदासाठीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. एकीकडे सत्तेतील सभापतीपदे या पक्षाने मिळविली असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदही याच पक्षाकडे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेप्रमाणे महानगरपालिकेतही विरोधी पक्ष राहिलेला नाही.भाजपाची चुप्पी कायम४जिल्हा परिषदेत भाजपाचे ५ सदस्य असताना त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीच्या वेळी चुप्पी कायम ठेवून एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना समर्थन दिले होते. महानगरपालिकेतही भाजपाची चुप्पी कायम दिसून आली.४सभागृहात पक्षाचे ८ सदस्य असताना व काँग्रेस- राष्ट्रवादी हे सत्तेत असताना विरोधी पक्षनेतेपदावरही भाजपा दावा करु शकत नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिका