शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

परभणी : हजारोंच्या उपस्थितीत नृसिंह जन्मोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:45 IST

टाळमृदंगाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण आणि नरहरी श्यामराज की जय, असा जयघोष करीत शनिवारी श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत नृसिंह जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपोखर्णी नृ. (परभणी) : टाळमृदंगाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण आणि नरहरी श्यामराज की जय, असा जयघोष करीत शनिवारी श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत नृसिंह जन्मोत्सव साजरा करण्यात आला.शनिवारी सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी १० वाजता प.पू.श्री.श्री. १००८ हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांची भागवत कथा झाली. दुपारी ४ वाजता ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे देवजन्माचे कीर्तन झाले. याच कीर्तनात ६.४१ वाजता गुलालाची उधळण करीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर श्रींचा रुद्राभिषेक, वसंत पूजा आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पोखर्णीत दाखल झाले होते. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. २९ एप्रिल रोजी सकाळी १० ते १ या वेळेत भागवत कथेचा समारोप होणार आहे. रात्री ९ वाजता श्रींची ग्रामप्रदक्षिणेसाठी पालखी मिरवणूक निघणार आहे. ३० एप्रिल रोजी वेदांताचार्य प्रल्हादशास्त्री दैठणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी