शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

परभणी : सीसीटीव्ही कॅमेऱ्याने शहर सुरक्षेत पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 23:51 IST

शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने शहराच्या सुरक्षेत भर पडली आहे. शिवाय पोलीस प्रशासनाला तपासासाठी मदत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने शहराच्या सुरक्षेत भर पडली आहे. शिवाय पोलीस प्रशासनाला तपासासाठी मदत झाली आहे.प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना मागील काही वर्षांपासून अंमलात आणली जात आहे. या अंतर्गत शहरात ठिकठिकाणी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होेते. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी यातील अनेक कॅमेरे नादुरुस्त झाले. परिणामी पोलीस प्रशासनाच्या अडचणीत वाढल्या होत्या. त्यामुळे शहरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता भासत असल्याने जिल्हा पोलीस दलाने या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला. या प्रस्तावास मंजुरी मिळून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून काही महिन्यांपासून शहरात नव्याने कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे कॅमेरे बसविताना शहरात येणारे सर्वच प्रमुख मार्ग कॅमेºयांच्या नजरेत येतील, याची काळजी घेण्यात आली. गंगाखेड रोड, वसमतरोड, जिंतूर रोड आणि पाथरी रस्त्यावर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बसविलेले कॅमेरे दीर्घकाळ टिकतील याची काळजी घेण्यात आली आहे. जास्तीत जास्त क्षेत्र कॅमेºयांच्या नजरेत येईल, या उद्देशाने सिमेंट काँक्रेट बेस तयार करुन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच कॅमेºयांची लेन्स उच्च प्रतिची आणि रात्रीच्या वेळीही छायाचित्रण होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या कॅमेºयांच्या तुलनेत हे कॅमेरे अधिक प्रभावी झाले आहेत. शहरात कॅमेरे बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, या कॅमेºयांमुळे शहर सुरक्षेत अधिक भर पडली आहे. शहरातील प्रमुख मार्गाबरोबरच बसस्थानक, रेल्वेस्थानक, शिवाजी चौक, राजगोपालाचारी उद्यान, उड्डाणपूल, विसावा कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अशा प्रमुख ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आल्याने हा सर्व भाग आता निगराणीखाली आला आहे.जुन्या कॅमेºयांचीही होणार दुरुस्ती४शहरात यापूर्वी ३६ सीसीटीव्ही कॅमरे बसविले होते. मात्र यातील अनेक कॅमेरे सद्यस्थितीला बंद अवस्थेत आहेत. या कॅमेºयांची वेळेत दुरुस्ती करणे गरजेचे आहे. जुने कॅमेरे दुरुस्त करुन कार्यान्वित केले तर शहरातील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होऊ शकते. त्यामुळे जुन्या कॅमेºयांच्या दुरुस्तीसाठी देखील प्रयत्न होण्याची गरज आहे.४२ सीसीटीव्ही कॅमेºयांची उभारणी४शहरातील प्रमुख मार्ग आणि चौकात ४२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यातील दोन कॅमेरे दंगा नियंत्रण पथकाच्या वाहनावर आहेत. ४ मेगा पिक्सल, नाईट व्हीजन आणि बुलेट कॅमेरे असल्याने या कॅमेºयांचा दर्जा उच्चप्रतिचा आहे. याशिवाय वसमत रोडवरील कृषी विद्यापीठ गेट आणि राजगोपालाचारी उद्यानाजवळ पीटीझेड कॅमेरे बसविण्यात आले आहेत.४हे कॅमेरे १८० डिग्रीमध्ये फिरतात त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र या कॅमेºयांत अंतर्भूत होत आहे. विशेष म्हणजे, या सर्व कॅमेºयांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वातानुकूलीत नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी चार एलईडी स्क्रिन बसविले असून, एकाच ठिकाणाहून संपूर्ण शहरातील हालचालींवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.कॅमेºयांची संख्या वाढविण्याची गरज४दर्गारोड, धार रोड, उड्डाणपुला खालील बाजू, खंडोबा बाजार, शनिवार बाजार, नांदखेडा रोड या भागात मोबाईल, पॉकेट चोरीचे प्रकार नित्याचे आहेत. या भुरट्या चोºयांवर आळा घालण्यासाठी या भागातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.४त्याचप्रमाणे शहरातील बँका, प्रमुख कार्यालये, मोठ्या व्यापारी प्रतिष्ठानांच्या बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे बंधनकारक केल्यास चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. शिवाय घडलेल्या घटनांचा तपास लावतानाही पोलीस प्रशासनाला मदत होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcctvसीसीटीव्ही