शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :शहरी भागातील रॉकेलचा कोटा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:28 IST

शहरी भागांमध्ये स्वयंपाकासाठी इंधन म्हणून रॉकेल ऐवजी गॅसचा वापर वाढावा, यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शहरी भागासाठी दिला जाणारा रॉकेलचा कोटा टप्प्याटप्प्याने रद्द करण्यात येणार असून जानेवारी महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरी भागांमध्ये स्वयंपाकासाठी इंधन म्हणून रॉकेल ऐवजी गॅसचा वापर वाढावा, यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शहरी भागासाठी दिला जाणारा रॉकेलचा कोटा टप्प्याटप्प्याने रद्द करण्यात येणार असून जानेवारी महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.राज्य शासनाने धूरमुक्त खेडी आणि शहरे ही मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी एलपीजी गॅसचा वापर स्वयंपाकासाठी करावा, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. दुसरीकडे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गोरगरीब नागरिकांना स्वयंपाकासाठी इंधन म्हणून अल्पदारामध्ये रॉकेलचा पुरवठा केला जात होता. मात्र आता शहरी भागात हा रॉकेलचा कोटा वितरीत केला जाणार नाही. जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने तो बंद केला जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी एका पत्राद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतील रॉकेलचा पुरवठा १ जानेवारी २०१८ पासून टप्प्या टप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी भाग केरोसीनमुक्त करण्याच्या उद्देशाने हा निर्णय झाला आहे. त्यामुळे नागरी भागामध्ये ज्या कुटुंबामध्ये स्वयंपाकासाठी इंधन म्हणून रॉकेलचा वापर केला जात होता. अशा कुटुंबियांना प्राधान्याने गॅस जोडणी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने कालांतराने फक्त ग्रामीण भागातच रॉकेल मिळणार आहे.१९१ किलो लिटर रॉकेल होणार कमी४राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाºयांनी शहरी भागाचा रॉकेल पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परभणी जिल्ह्याला आतापर्यंत ९७२ किलो लिटर रॉकेलचा पुरवठा सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केला जात होता. यापुढे महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी येणारे १९१ किलो लिटर रॉकेल बंद होणार आहे. त्यामुळे ७८१ किलो लिटर रॉकेलचा कोटा जिल्ह्यासाठी उपलब्ध होईल. हा सर्व कोटा केवळ ग्रामीण भागामध्ये वितरित होणार आहे.नवीन गॅस कनेक्शनसाठी स्वतंत्र प्रयत्न४शहरी भागात रॉकेलचा कोटा रद्द केल्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून याची काळजी प्रशासन घेत आहे. शिधापत्रिका धारकांकडे गॅस कनेक्शन आहे किंवा नाही, याची तपासणी तलाठी व इतर कर्मचाºयांकडून केली जाणार आहे. त्याच प्रमाणे ज्या कुटुंबांचे नाव २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीची जनगणनामध्ये नोंद आहे व ज्यांच्याकडे गॅस जोडणी नाही, अशा कुटुंबियांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत कर्ज स्वरुपात किंवा विना कर्ज स्वरुपात त्वरित गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.