शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

आरोग्याच्या रोडमॅपसाठी परभणीचे शिबीर उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:17 IST

येथे शिवसेनेच्या वतीने आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे डाक्युमेंटशन होणे आवश्यक आहे़ त्यामुळे भविष्यकाळात या भागातील आरोग्याचा रोडमॅप तयार करण्यासाठी या शिबिराचा उपयोग होईल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी येथे बोलताना केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथे शिवसेनेच्या वतीने आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे डाक्युमेंटशन होणे आवश्यक आहे़ त्यामुळे भविष्यकाळात या भागातील आरोग्याचा रोडमॅप तयार करण्यासाठी या शिबिराचा उपयोग होईल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी येथे बोलताना केले़परभणी येथे शिवसेनेच्या वतीने आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून १३ फेब्रुवारीपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास शनिवारी आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी भेट दिली़ यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते़ व्यासपीठावर आ़ डॉ़ राहुल पाटील, जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ़ वेदप्रकाश पाटील, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, बाजार समितीचे संचालक गंगाप्रसाद आणेराव, आयएमएचे जिल्हाध्यक्ष राजू सुरवसे, डॉ़ अश्विन पाटील, डॉ. जावेद अथर आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना आरोग्यमंत्री डॉ़ सावंत म्हणाले की, परभणी येथे आयोजित करण्यात आलेले महाआरोग्य शिबीर विक्रमी ठरले आहे़ या शिबिरात ९० हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यातील ८ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत़ प्रसिद्ध नेत्र रोग तज्ज्ञ डॉ़ तातेराव लहाने यांनीही या शिबिरात भाग घेऊन रुग्णांची तपासणी केली़ त्यांच्याकडूनही डोळ्याच्या शस्त्रक्रिया जातील़ परंतु, त्यानंतरही काही वेगळ्या आजाराच्या व खर्चिक शस्त्रक्रिया असतील तर मी स्वत: त्या विनामूल्य करून देईल, असा शब्दही यावेळी त्यांनी दिला़ आ़ डॉ़ पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना डॉ़ सावंत म्हणाले की, परभणीकर जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन डॉ़ पाटील यांनी नि:स्वार्थ भावनेतून आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांना लाभ मिळाला आहे़ या शिबिराने आरोग्य विभागाचे काम सोपे झाले आहे़ या शिबिराचे डाक्युमेंटेशन झाले पाहिजे़ कारण भविष्य काळात या भागातील आजारांच्या अनुषंगाने रोडमॅप तयार करण्यासाठी या शिबिराचा उपयोग होईल़ रोगमुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस या निमित्ताने परभणीतून प्रारंभ झाला आहे, असेही ते म्हणाले़ यावेळी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले़ यावेळी उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख नंदू आवचार, अनिल डहाळे, संदीप झाडे, नवनीत पाचपोर, नगरसेवक प्रशास ठाकूर, चंदू शिंदे, सुशील कांबळे, विजय ठाकूर, राहुल कांबळे, प्रसाद चामणे, मारोती तिथे, अजय पेदापल्ली, असलम शेख आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले़ यावेळी आयएमएच्या टेलीफोन डिरेक्ट्रीचे प्रकाशन करण्यात आले़ यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची उपस्थिती होती़सव्वा कोटींच्या औषधींचे वाटपशहरातील नूतन विद्यालयाच्या प्रांगणात १३ फेब्रुवारीपासून या शिबिरास सुरुवात झाली़ शनिवारी या शिबिराचा समारोप झाला़ गेल्या पाच दिवसांत या शिबिरात ९० हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये गरजूंना जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या औषधींचे मोफत वाटप करण्यात आले असल्याची माहिती संयोजक आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़ परभणीकरांचे आरोग्य चांगले व सुदृढ रहावे यासाठी शिवसेनेच्या वतीने या पुढेही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे यावेळी आ़ पाटील यांनी सांगितले़जिल्हा रुग्णालयातील प्रश्न सहा महिन्यांत सोडविणारया कार्यक्रमानंतर पत्रकारांनी आरोग्यमंत्री डॉ़ सावंत यांच्याशी संवाद साधला़ त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत मुबलक प्रमाणात अधिकाºयांची पदे भरलेली आहेत़ सिटीस्कॅन मशीनसह अन्य सुविधांचे प्रश्न सहा महिन्यांत सोडविण्यात येतील़ शहरात नव्याने मंजूर झालेल्या स्त्री रुग्णालयाच्या कामाला गती मिळावी, यासाठी आपण वैयक्तीकरित्या लक्ष देऊन व त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी डॉ़ सावंत यांनी दिली़पाच इमारतींचे लोकार्पणआरोग्यमंत्री डॉ़ दिपक सावंत यांच्या हस्ते शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील ५ इमारतींचे लोकार्पण करण्यात आले़ त्यात आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय येथील प्रशासकीय इमारत, औषधी भांडार इमारत, मनोरुग्ण, बालरुग्ण व कैदी कक्ष इमारत, बाह्य रुग्ण विभाग, विस्तारीकरण पहिला मजला, अपघात विभाग नूतनीकरण इमारत आणि मेट्रो ब्लड बँक इमारत आणि रुग्णांच्या नातेवाइकांसाठी बांधलेल्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले़ यावेळी खा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, सीईओ बी़पी़ पृथ्वीराज, आरोग्य उपसंचालक डॉ़ विजय कंदेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक जावेद अथर, डॉ़ प्रकाश डाके, संजय पार्डीकर आदींची उपस्थिती होती़