शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘जगात प्रतिष्ठा असलेला बौद्ध धम्म आचरणात आणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:01 IST

नम्रता, चारित्र्य, नितीमत्ता या बौद्ध तत्वज्ञानाचे बौद्ध धम्मात पालन केले जाते. त्यामुळेच थायलंड, कोरिया, जापान सारख्या देशांचा विकास झालेला आहे. त्यामुळे जगात प्रतिष्ठा असलेला बौद्ध धम्म आचारणात आणा, असे आवाहन डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांनी येथे धम्मदेसना कार्यक्रमात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नम्रता, चारित्र्य, नितीमत्ता या बौद्ध तत्वज्ञानाचे बौद्ध धम्मात पालन केले जाते. त्यामुळेच थायलंड, कोरिया, जापान सारख्या देशांचा विकास झालेला आहे. त्यामुळे जगात प्रतिष्ठा असलेला बौद्ध धम्म आचारणात आणा, असे आवाहन डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांनी येथे धम्मदेसना कार्यक्रमात केले.परभणी शहरातील गंगाखेड रस्त्यावरील कृष्णाई ग्रीन पार्क येथे सोमवारी सायंकाळी डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, भन्ते काश्यप यांच्या धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो म्हणाले की, जगाला आज तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची अत्यंत आवश्यकता आहे. अशांत वातावरणात तथागतांचे विचारच जगाला तारु शकतात. बुद्ध देशांमध्ये सूक्ष्म पद्धतीने धम्म आचरण केले जाते. नम्रता, चारित्र्य, नीतिमत्ता या बौद्ध तत्वज्ञानाचे त्या देशांमध्ये पालन होते. त्यामुळेच थायलंड, दक्षिण कोरिया, जपान सारख्या देशांचा सर्वांगीण विकास झाला आहे. त्यामुळे जगात प्रतिष्ठा असलेला बौद्ध धम्म आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कलावतीबाई हत्तीअंबिरे, भीमराव जोंधळे हे थायलंडमधील बौद्धस्थळांना भेटी देऊन आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मध्यप्रदेशातील इंदोर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांचाही उपस्थितांच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, आठवले गटाच्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य संघटक डी.एन.दाभाडे, डॉ.श्रीराम मसलेकर, पीआरपीचे नेते गौतम मुंडे, प्रा.डॉ.भीमराव खाडे, प्रा.संजय जाधव, डॉ. बी.टी.धुतमल, डॉ. प्रकाश डाके, अ‍ॅड.रवि गायकवाड, अ‍ॅड. महेंद्र गायकवाड आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राहुल वहिवाळ यांनी तर आभार प्रदर्शन मंचक खंदारे यांनी केले.

टॅग्स :parabhaniपरभणीJapanजपानThailandथायलंड