शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत धाडसी चोरी ; यशोधननगरमध्ये भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी ३० तोळे सोने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 11:25 IST

शहरातील यशोधन नगरात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून ३० तोळे सोने चोरुन नेल्याची घटना मंगळवारी (दि. २४)  घडली़. दरम्यान, चोरीचा हा प्रकार मंगळवारी रात्री निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे़.

ठळक मुद्देयशोधन नगरात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून ३० तोळे सोने चोरून नेले भर दिवसा चोरी होण्याचा या भागातील हा दुसरा प्रकार आहे़.

परभणी- शहरातील यशोधन नगरात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून ३० तोळे सोने चोरुन नेल्याची घटना मंगळवारी (दि. २४)  घडली़. दरम्यान, चोरीचा हा प्रकार मंगळवारी रात्री निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे़. यशोधननगर भागात मागील एक वर्षामध्ये सुमारे १० ते १२ चो-या झाल्या आहेत़. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच या भागातील देशमुख यांच्या घरीही भर दिवसाच चोरी झाली होती़. भर दिवसा चोरी होण्याचा हा दुसरा प्रकार आहे़.

येथील पंचायत समितीमधील कर्मचारी प्रमोद गंगाराम अन्नपुर्वे यांचे यशोधन नगर भागात घर आहे़. दिवाळीच्या सणानिमित्त २४ आॅक्टोबर रोजी त्यांच्या घरातील सदस्य अंबाजोगाई येथे नातेवाईकांकडे गेले होते़. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास प्रमोद अन्नपुर्वे हे देखील घराला कुलूप लावून कार्यालयात गेले़. रात्री ९.३० च्या सुमारास ते घरी परतले तेव्हा चोरी झाल्याचा प्रकार समोर आला़. चोरट्यांनी टेरेसवरून खाली उतरत मागच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविला़. घरातील सर्वसाहित्य अस्ताव्यस्त फेकून कपाटामध्ये ठेवलेले साधारणत: ३० तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत़.

या घटनेनंतर अन्नपुर्वे यांनी रात्री उशिरा पोलिसांना माहिती दिली़ मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही़ व्ही़ श्रीमनवार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले़ परंतु, श्वान माग काढू शकला नाही़. याप्रकरणी अन्नपुर्वे यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़.

चोरीच्या दहा ते बारा घटनायशोधननगर भागात मागील एक वर्षामध्ये सुमारे १० ते १२ चो-या झाल्या आहेत़. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या भागातील देशमुख यांच्या घरीही भर दिवसा चोरी झाली होती़. भर दिवसा चोरी होण्याचा हा दुसरा प्रकार आहे़. परंतु; पोलिसांना तपासात अजूनही यश आलेले नाही़. 

सुयोग कॉलनीत चोरांचा धुमाकूळमंगळवारी रात्री यशोधन नगरालगत असलेल्या सुयोग कॉलनीतही चोरट्यांनी धुमाकूळ घातला़. या भागात राहणारे देवीदास गळाकाटू यांचे भाडेकरू रामदास खरवडे यांच्या घरी चोरी झाली.यात नगदी १० हजार रुपये आणि दागिने असा १५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला़. तसेच जायभाये यांच्या घरीही चोरट्यांनी चोरी केली़ विशेष म्हणजे जायभाये यांच्या घरी चोरी करताना घरात जागोजागी गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसत आहे़.