शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: १ हजार ४३९ ग्राहकांच्या घरांसमोर बँड वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:15 IST

महावितरणच्या परभणी मंडळ कार्यालयांतर्गत वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढत आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले जिल्ह्यामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १४३९ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३३ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज ग्राहकांच्या घरासमोर १८ सप्टेंबरपासून बॅण्ड वाजवत वीज बिल भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महावितरणच्यापरभणी मंडळ कार्यालयांतर्गत वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढत आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले जिल्ह्यामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १४३९ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३३ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज ग्राहकांच्या घरासमोर १८ सप्टेंबरपासून बॅण्ड वाजवत वीज बिल भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येणार आहे.परभणी ग्रामीण उपविभागांतर्गत ५८८ वीज ग्राहकांकडे ११ कोटींची थकबाकी आहे. तसेच परभणी शहरातील २५९ वीज ग्राहकांकडे ८ कोटी ५ लाख, पाथरी उपविभागांतर्गत ६५ ग्राहकांकडे १ कोटी ७३ लाख, पूर्णा उपविभागांतर्गत ७४ ग्राहकांकडे १ कोटी ४१ लाख, गंगाखेड उपविभागातील ६३ ग्राहकांकडे १ कोटी ९५ लाख, जिंतूर उपविभागांतर्गत १९८ वीज ग्राहकांकडे ४ कोटी २९ लाख, मानवत उपविभागातील ३८ वीज ग्राहकांकडे १ कोटी २६ लाख, सेलू उपविभागातील ७८ ग्राहकांकडे १ कोटी ९२ लाख तर सोनपेठ उपविभागातील ४५ ग्राहकांकडे ८९ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीच्या गर्देत सापडलेल्या महावितरणने बुधवारपासून सुरु होणाऱ्या या विशेष वसुली मोहिमेत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, जनमित्र सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर पोलीस यंत्रणा सोबत असणार आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी त्वरित बिलाचा भरणा करुन वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.३१ ग्राहकांकडे ७७ लाख थकले४पालम वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांतर्गत १ लाखा पेक्षा जास्त थकबाकीदार असणारे ९ ग्राहक असून त्यांच्याकडे १२ लाख ९ हजारांची थकबाकी असून ५० हजार पेक्षा जास्त थकबाकीदार असणारे ४७ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे २९ लाख ८७ हजा रुपयांची थकबाकी राहिली आहे.४सदरील ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून अनेक वेळा सूचना देऊनही त्यांनी देयके भरली नाहीत. परिणामी वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरील ग्राहकांवर त्यांच्या घरासमोर बँड वाजवून त्यांची वीज जोडणी तोडली जाणार आहे. तसेच टप्याटप्याने थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपकार्यकारी अभियंता विवेकानंद स्वामी यांनी दिला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण