शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

परभणी : सरमिसळ पद्धतीने साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:37 IST

विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ पद्धतीने नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ६ हजार ६०८ कर्मचाºयांना मतदान केंद्राध्यक्ष आणि ३ मतदान केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ पद्धतीने नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ६ हजार ६०८ कर्मचाºयांना मतदान केंद्राध्यक्ष आणि ३ मतदान केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे़विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १८ हजार २४६ कर्मचाºयांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती़ या कर्मचाºयांची प्रथम सरमिसळ आॅनलाईन पद्धतीने करण्यात आली़ त्यात विधानसभानिहाय ८ हजार २७० कर्मचाºयांची निवड करण्यात आली होती़ जिंतूर मतदार संघासाठी १ हजार ७४१, परभणी मतदार संघासाठी २ हजार ४१९, गंगाखेड २ हजार ३०१ आणि पाथरी विधानसभा मतदार संघासाठी १ हजार ८०९ कर्मचाºयांची नियुक्ती केली़ त्यानंतर ६ आॅक्टोबर रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर आणि मुख्य निवडणूक निरीक्षक भूपेंद्रसिंह आणि विजय केतन उपाध्याय यांच्या उपस्थितीत आॅनलाईन पद्धतीने द्वितीय सरमिसळ करण्यात आली़यात कर्मचाºयांना विधानसभानिहाय नियुक्ती देण्यात आली आहे़ त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात ४४८ मतदान केंद्राध्यक्ष, ४४८ प्रथम मतदान अधिकारी आणि ८९६ इतर मतदान अधिकारी अशी १ हजार ७९२ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली़ परभणी मतदार संघात ३३३ मतदान केंद्र अध्यक्ष, ३३३ प्रथम मतदान अधिकारी आणि ६६६ इतर मतदान अधिकारी असे १ हजार ३३२ कर्मचाºयांना नियुक्ती देण्यात आली़ गंगाखेड मतदार संघात ४३७ मतदान केंद्र अध्यक्ष, ४३७ प्रथम मतदान अधिकारी आणि ८७४ इतर मतदान अधिकारी अशा १ हजार ७४८ तर पाथरी विधानसभा मतदार संघात ४३४ मतदान केंद्र अध्यक्ष, ४३४ प्रथम मतदान अधिकारी आणि ८६८ इतर मतदान अधिकारी अशा १ हजार ७३६ कर्मचाºयांची निवड करण्यात आली आहे़ चारही मतदारसंघांत मिळून मतदान केंद्रासाठी ६ हजार ६०८ कर्मचाºयांची निवड करण्यात आली आहे़दीड हजार कर्मचारी पथकात४द्वितीय सरमिसळ पद्धतीतून १ हजार ६५२ कर्मचाºयांची पथकामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे़४त्यात जिंतूर ४४८, परभणी ३३३, गंगाखेड ४३७ आणि पाथरी विधानसभा मतदार संघात ४३४ कर्मचाºयांचा समावेश आहे़ विशेष म्हणजे निवडणूक कामासाठी एकूण ४७० महिला कर्मचाºयांचीही नियुक्ती केली आहे़४त्यात जिंतूर व परभणी मतदार संघात प्रत्येकी १५०, गंगाखेड मतदार संघात ८० आणि पाथरी मतदार संघात ९० महिला कर्मचाºयांचा समावेश आहे़मतदान यंत्रांचे वर्गीकरण सुरू४परभणी : जिल्ह्यातील चारही मतदार संघासाठी रँडमायझेशन झालेल्या मतदान यंत्रांचे विधानसभानिहाय वर्गीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे़४येथील कल्याण मंडपम्मध्ये मतदान यंत्रांचे ९ आॅक्टोबर रोजी वर्गीकरण करण्यात आले़ गुरुवारी देखील दिवसभर हे काम केले जाणार असून, त्यानंतर ११ आॅक्टोबर रोजी विधानसभा निहाय निश्चित केलेले मतदान यंत्र त्या त्या मतदारसंघात पाठविले जाणार आहेत़४तेथून या मतदान यंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वर्गीकरण होणार आहे़रविवारी कर्मचाºयांचे द्वितीय प्रशिक्षण४निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांचे दुसरे प्रशिक्षण १३ आॅक्टोबर रोजी घेतले जाणार आहे़ जिंतूर येथे जवाहर विद्यालयात, परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात, गंगाखेड येथे कोद्री रोडवरील संत जनाबाई महाविद्यालयात तर पाथरी येथे माळीवाडा परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत हे प्रशिक्षण होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019