शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:52 IST

जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांसाठी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सप्टेंबर महिन्याकरीता आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर केले असून २४ अर्धघाऊक विक्रेत्यांना हे नियतन वितरित करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांसाठी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सप्टेंबर महिन्याकरीता आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर केले असून २४ अर्धघाऊक विक्रेत्यांना हे नियतन वितरित करण्यात येणार आहे.परभणी जिल्ह्यात रॉकेल नियतन वितरणात अनियमितता झाल्याचा प्रकार जिंतूर तहसील कार्यालयाच्या निमित्ताने समोर आला होता. पुरवठा विभागाच्याच अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने नियतन मंजूर करुन दर महिना हजारो लिटर रेशनकार्डधारकांचे रॉकेल काळ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन दिल्याची बाब समोर आली होती. या संदर्भात तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी सर्वच रेशनकार्डधारकांकडून गॅस वापरत नाही, याबाबतचे हमीपत्र घेण्याचे आदेश सर्व रेशनदुकानदारांना दिले आहेत. त्यामुळे बनावट रेशनकार्डधारकांची संख्या दाखवून अधिकचे नियतन मिळविणाºया दुकानदारांची गोची झाली आहे. जिल्हाधिकाºयांच्या हमीपत्र मागविण्याच्या आदेशाला जवळपास महिनाभराचा कालावधी लोटला तरी परिपूर्ण माहिती जिल्हाधिकाºयांकडे उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी जोपर्यंत हमीपत्रधारकांची पूर्ण माहिती येणार नाही, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे पूर्ण रॉकेल नियतन वितरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी नियमित रॉकेल वितरणातही आखडता हात घेतला आहे. सप्टेंबर महिन्यासाठी जिल्ह्याला ८६४ केएल रॉकेलचे नियतन प्राप्त झाले होते. आॅगस्ट महिन्याचे १४० के.एल. रॉकेल जिल्हा पुरवठा विभागाकडे शिल्लक आहे. यातील सप्टेंबर महिन्याचे ६० टक्के नियतन वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ९ सप्टेंबर रोजी १९२ केएल रॉकेल नियतन वितरणाचे आदेश काढण्यात आले होते. आता पुन्हा १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांनी २०४ केएल रॉकेल नियतन वितरणाचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये २४ अर्धघाऊक विक्रेत्यांना जिल्हाभरात रॉकेल वितरणासाठी देण्यात आले आहे. यामध्ये बहुचर्चित जिंतूर तालुक्याला ३९ केएल रॉकेल मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये ४ वितरकांचा समावेश आहे. चारही वितरकांना १०० टक्के द्वारपोहोच योजनेंतर्गत हे रॉकेल देण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यातील रॉकेल वितरण बाकीजिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी यापूर्वी सप्टेंबर महिन्यासाठी १९२ केएल रॉकेल मंजूर केले होते. काही अर्धघाऊक विक्रेत्यांनी यातील रॉकेलची उचल केली नसल्याची चर्चा आहे. विशेषत: जिंतूर तहसील कार्यालयाच्या परिसरात रॉकेलचे टँकर उभे आहेत. जिल्हाधिकाºयांनी अचानक रॉकेल नियतनात कपात केल्याने चुकीच्या मार्गाने रॉकेल वितरित करणाºयांचे धाबे दणाणले असून जिल्हाधिकाºयांवरच दबाव आणण्यासाठी रॉकेल न उचलण्याची खेळी काही जणांकडून सुरु असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी यासंदर्भात कडक भूमिका घेतल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.अहवाल जिल्हा कचेरीस मिळेनाजिंतूर येथील केरोसीन नियतन वितरणात अनियमितता झाल्याचे प्रकरण जवळपास ४० दिवसांपूर्वी उघडकीस आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.याबाबतचा खुलासाही जिंतूर येथील अधिकाºयांकडून मागविण्यात आला आहे; परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयास याबाबतचा अहवाल आणि खुलासा अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत का दिरंगाई केली जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी