शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

परभणी : आतापर्यंतचे सर्वच अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 22:58 IST

जिल्ह्यात तब्बल १६ दिवसांपासून कोरोनाच्या अनुषंगाने संशयितांच्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यात आतापर्यंत १३४ जणांची तपासणी केल्यानंतरही एकही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे जिल्हावासियांनी आणखी काही दिवस शासनाने घालून दिलेल्या नियमांची तंतोतंत अंमलबजावणी केल्यास कोरोनावर निश्चितच मात केली जाऊ शकते, असेच आतापर्यंतच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात तब्बल १६ दिवसांपासून कोरोनाच्या अनुषंगाने संशयितांच्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यात आतापर्यंत १३४ जणांची तपासणी केल्यानंतरही एकही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे जिल्हावासियांनी आणखी काही दिवस शासनाने घालून दिलेल्या नियमांची तंतोतंत अंमलबजावणी केल्यास कोरोनावर निश्चितच मात केली जाऊ शकते, असेच आतापर्यंतच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे.जिल्ह्यात १२ मार्चपासून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. १२ मार्चपासून जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक उपस्थिती बंद करण्यात आली. तसेच जिल्ह्यात दुबईहून परतलेल्या पाच जणांचे स्वॅब घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत याच दिवशी पाठविण्यात आले. नंतर या सर्वांचे स्वॅब निगेटीव्ह आले. त्यापुढील काळातही जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करीत विविध उपाययोजना अंमलात आणल्या. १६ मार्चपासून राज्यभरात लॉकडाऊन सुरु झाला. त्यानंतर केंद्र सरकारने २३ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली आहे. या दरम्यानच्या काळात आतापर्यंत जिल्ह्यातील १३४ कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८५ जणांचे स्वॅब घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी ६२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ८ जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. प्रयोगशाळेने १५ जणांचे अहवाल तपासण्याची आवश्यता नाही म्हणून रिजेक्ट केले आहेत. या १३४ जणांपैकी ५६ नागरिक परदेशातून आले असून त्यांच्या संपर्कात ५ व्यक्ती आल्या आहेत. जिल्ह्यातील १३४ संशयितांपैकी ११० जणांना होम क्वॉरनटाईन करण्यात आले असून १२ जणांवर दवाखान्यातच संसर्गजन्य कक्षातच निगराणीत ठेवण्यात आले आहे. उर्वरित १२ जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. २७ मार्च रोजी ४ नवीन संशयित व्यक्तीचे स्वॅब घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात गेल्या १६ दिवसांत एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला नाही, ही सर्वात जमेची बाब आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही शासनाच्या निर्देशाचे पालन केल्यास जिल्हावासीय कोरोनावर निश्चित मात करु शकतात.खाजगी दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश -जिल्हाधिकारीलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश संबंधितांना दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले असून याची अंमलबजावणी न करणाºया डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिला आहे.जिल्ह्यात खाजगी दवाखाने बंद असल्याने नियमित उपचारासाठी येणाºया रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र दिले आहे. त्यांना ओपीडी बंद करता येणार नाही. तसेच त्यांना दवाखाने सुरु ठेवण्यास सांगण्यात आले आहे.नियमित रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यांना वेळेत योग्य तो उपचार मिळाला पाहिजे. त्यामुळे डॉक्टरांनीही संवेदनशिलता बाळगून आपले दवाखाने सुरु ठेवले पाहिजेत. शासनाच्या आदेशाचे पालन न करणाºया डॉक्टरांवर कारवाई करणार, असा इशाराही मुगळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.आयएमएच्या सर्व सदस्यांचे दवाखाने सुरुच- राजू सुरवसे४इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असलेल्या जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांचे दवाखाने सुरु आहेत. महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलने टेलिफोनिक कन्सल्टंटला मंजुरी दिली आहे़ त्यानुसार ५० टक्के रुग्णांना या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे. शिवाय अन्य सदस्यांचीही सेवा सुरुच आहे. इतर संघटनांच्या दवाखान्यासंदर्भात काय स्थिती आहे, या संदर्भात, आपण बोलणे योग्य राहणार नाही. प्रशासनाने प्रत्येक गाव/ शहरातील एकूण दवाखान्यांची संख्या व चालू आणि बंद असलेल्या दवाखान्यांची माहिती घेतल्यास सत्यस्थिती बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ.राजू सुरवसे यांनी दिली.सेलू शहरात बंद केलेले दवाखाने सुरुलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्याने शहरातील काही खाजगी दवाखाने बंद ठेवले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचा आदेश आल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांनी संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली. त्यामुळे गुरुवारी बंद असलेले खाजगी दवाखाने शुक्रवारी उघडण्यात आले.कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. या परिस्थितीत सेलू शहरातील काही खाजगी डॉक्टरांनी आपली ओपीडी सुरु ठेवली आहे. तर काही डॉक्टरांनी मात्र ओपीडी बंद ठेवली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. मधुमेह, हृदयविकार, बालरोग तज्ज्ञ, स्त्री रोग, आयुर्वेदिक, जनरल फिजिशियन, होमियोपॅथिक, दंत विकार, कान, नाक, घसा तज्ज्ञ, नेत्रविकार तज्ज्ञ आदींकडे तपासणीसाठी येणारे रुग्ण बंद झाले होते. त्यामुळे हे रुग्ण हवालदिल झाले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्याकडे काही रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांना या संदर्भात कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानंतर डॉ.हरबडे यांनी संबंधित डॉक्टरांशी चर्चा करुन त्यांना याबाबत माहिती दिली व शासनाच्या नियमाचे उल्लंघन करता येणार नाही, असे केले तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. त्यानंतर गुरुवारी बंद असलेले खाजगी दवाखाने शुक्रवारी उघडण्यात आल्याचे दिसून आले.शहरातील काही खाजगी दवाखाने लॉकडाऊननंतर बंद असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. विशेषत: हृदयरोग, मधुमेह, नेत्ररोग, अस्थीरोग तज्ज्ञ आदी दवाखाने सुरु नव्हते. आपद्कालीन स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार गुरुवारी शहरातील सर्व खाजगी दवाखाने सुरु करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शुक्रवारी अनेक खाजगी दवाखाने उघडण्यात आली. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांना पाठविणार आहे.-डॉ.संजय हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, सेलू

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या