शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दोन महिन्यांनंतरही बंधारे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:08 IST

पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटत आहे़ फक्त धन जोपासणारा पाऊस पडत असल्याने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी काळात जोरदार पाऊस पडला नसल्याने गोदावरी नदीच्या पात्रात अद्याप पूर आला नसल्याने दोन महिन्यानंतरही तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल बंधारे कोरडेठाक आहेत़ त्यामुळे या भागात मोठ्या पाऊसाची प्रतीक्षा कायम आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटत आहे़ फक्त धन जोपासणारा पाऊस पडत असल्याने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी काळात जोरदार पाऊस पडला नसल्याने गोदावरी नदीच्या पात्रात अद्याप पूर आला नसल्याने दोन महिन्यानंतरही तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल बंधारे कोरडेठाक आहेत़ त्यामुळे या भागात मोठ्या पाऊसाची प्रतीक्षा कायम आहे़पाथरी तालुक्यात मागील तीन ते चार वर्षापासून सतत दुष्काळ पडत आहे़ गतवर्षी या भागात पावसाळ्यात सुरुवातीला दोन महिने पाऊस पडला होता़ आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पडलेल्या पाऊसानंतर पाऊस न पडल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती़ तसेच जायकवाडी धरणात पाणी नसल्याने डावा कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही़ त्यामुळे बागायती पिकांना मोठा फटका बसला होता़ यावर्षी सुरुवातीला तालुक्यातील काही भागात पाऊस पडल्याने वेळेत खरिपाच्या पेरण्या झाल्या तर अर्ध्या भागात म्हणजेच बाभळगाव पट्टयात पाऊस पडला नाही़ यामुळे उशिरा तर काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली आहे़मागील आठ दिवसापासून ढगाळ वातावरण असताना जोरदार पाऊस पडत नाही़ पाऊस कमी असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी अद्याप वाढली गेली नाही़ तसेच नदी नाल्यांना पूरही आला नाही़ जुलै महिना संपला, तरी मोठा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे़ पाथरी तालुक्यात गोदावरी नदीच्या पात्रात उच्च पातळीचे ढालेगाव आणि मुदगल येथे बंधारे आहेत़ या दोन्ही बंधाºयावर गोदाकाठच्या गावातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे़ दोन्ही बंधारे अद्यापही कोरडेठाक आहेत़शहराची पाणी समस्या गंभीर४पाथरी शहराला गोदावरी नदीच्या पात्रातील रामपुरी रत्नेश्वर येथून पाणी पुरवठा केला जातो़४भर उन्हाळ्यात पात्र कोरडे पडल्याने गेल्या मे महिन्यापासून शहराच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे़४मे महिन्यात पासून पाणी पुरवठ्याचे नियोजन करताना नगर पालिकेला मोठी कसरत करावी लागत आहे़ शहरातील काही वॉर्डात नगर पालिकेने टँकरने पाणी पुरवठा केला़भर पावसाळ्यात १२ दिवसांआड पाणी४ढालेगाव बंधाºयात भर पावसाळ्यात पाणी आले नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात १२ दिवसांआड पाणी पुरवठा होतोय अशीच परिस्थिती राहिली तर शहराच्या पाण्याची समस्या अधिक बिकट होणार आहे़