शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाथरीत १४ हजार लिटर दुधाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:12 IST

येथील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कूलर बंद पडल्याने १४ मार्च रोजी अचानक संकलन केंद्राला कुलूप लावण्यात आले़ त्यामुळे दूध घालण्यासाठी आलेले उत्पादक संतप्त झाले़ शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करावे लागले़ अखेर परभणी येथील शासकीय दूध संकलन केंद्रावर दूध पाठविण्याचा निर्णय झाल्याने तात्पुरता प्रश्न मिटला़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : येथील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कूलर बंद पडल्याने १४ मार्च रोजी अचानक संकलन केंद्राला कुलूप लावण्यात आले़ त्यामुळे दूध घालण्यासाठी आलेले उत्पादक संतप्त झाले़ शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करावे लागले़ अखेर परभणी येथील शासकीय दूध संकलन केंद्रावर दूध पाठविण्याचा निर्णय झाल्याने तात्पुरता प्रश्न मिटला़राज्य शासनाचे परभणी येथे दूध संकलन केंद्र आहे़ या अंतर्गत पाथरी येथे १२ वर्षांपासून दूध संकलन केले जाते़ शेती व्यवसायात प्रत्येक वर्षी तोटा होत असल्याने या भागातील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत़ त्यामुळे पाथरीत दुधाचे संकलन वाढले आहे़दररोज सुमारे १४ हजार लिटर दूध संकलन या ठिकाणी होते़ सकाळच्या सत्रात ९ हजार तर सायंकाळच्या सत्रात ५ हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते़ येथील दूध संकलन केंद्राची क्षमता ४ हजार लिटर एवढी आहे़ दरम्यान, दूध थंड करण्यासाठी या केंद्रावर ३ बल्क कूलर बसविले आहेत़ त्यातील एक कूलर कायमस्वरुपी बंद असून, चार दिवसांपूर्वी अन्य एक कूलर बंद पडले़ त्यामुळे पाथरीतील दूध संकलनाचा प्रश्न उद्भवला आहे़१३ मार्च रोजी जिल्हा कार्यालयाने दूध उत्पादक संस्थेच्या नावाने पत्र काढून दूध संकलन केले जाणार नाही़ उत्पादकांनी आपले दूध परभणी येथील केंद्रावर न्यावे, असे कळविले़ मात्र काही संस्थांना हे पत्र मिळाले नाही़त्यामुळे बुधवारी सकाळी दुधाने भरलेली वाहने बाजार समितीच्या आवारात असलेल्या संकलन केंद्रात दाखल झाले़ मात्र केंद्राला कुलूप होते़ त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले़ शेतकºयांचा रोष वाढत गेला़ आणलेले दूध फेकून देण्याच्या तयारीत असतानाच पोलीस घटनास्थळी दाखल झाले़पोलिसांनी अधिकाºयांसमवेत चर्चा केल्यानंतर येथील दूध शासकीय दुग्ध संकलन केंद्रात नेण्याचा निर्णय झाल्याने हा प्रश्न तात्पुरता मिटला आहे़ यावेळी दुग्ध उत्पादक संस्थेचे पप्पू घांडगे, विठ्ठल गिराम, अविनाश आमले, शिवाजीराव नखाते, विजय कोल्हे, शेख खय्युम यांची उपस्थिती होती़कूलर दुरुस्त : करण्याची मागणीयेथील दूध संकलन केंद्रात ३ बल्क कूलर आहेत़ त्यापैकी एक कूलर अनेक वर्षांपासून बंद आहे़ तर चार दिवसांपूर्वी दुसरे कूलर बंद पडल्याने ही स्थिती निर्माण झाली़ केंद्रातील बल्क कूलर दुरुस्तीबाबत अनास्था का बाळगली जात आहे़, असा प्रश्न आता उत्पादक उपस्थित करू लागले आहेत़ वेळीच बल्क कूलर दुरुस्त झाले असते तर शेतकºयांची गैरसोय झाली नसती़ प्रशासनाने तातडीने पावले उचलून बल्क कूलरची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे़शेतकºयांचे गुरुवारी आंदोलनबल्क कूलर बंद झाल्याने पाथरीतील दूध खरेदीची अडचण निर्माण झाली़ सकाळी हा वाद मिटला तरी सायंकाळी पुन्हा पाथरी येथे दूध घेण्यास नकार दिल्याने संतप्त शेतकºयांनी अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना तोडगा काढण्याची विनंती केली़ याबाबत निर्णय झाला नसल्याने १५ मार्च रोजी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती पप्पू घांडगे, विठ्ठल गिराम यांनी दिली़