शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :२० कोटी रुपयांच्या विजेचा अतिरिक्त वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:33 IST

उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे विजेची मागणी वाढते़ यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली तशी विजेची मागणीही वाढली असून, तीन महिन्यांमध्ये तब्बल २० कोटी रुपयांची जास्तीची वीज परभणीकरांनी वापरली आहे़ त्यामुळे अतिरिक्त वीज पुरवठा करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे विजेची मागणी वाढते़ यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली तशी विजेची मागणीही वाढली असून, तीन महिन्यांमध्ये तब्बल २० कोटी रुपयांची जास्तीची वीज परभणीकरांनी वापरली आहे़ त्यामुळे अतिरिक्त वीज पुरवठा करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली़वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपकरणे वापरली जातात़ यात बहुतांश उपकरणे ही विजेवर चालणारी असल्याने विजेचा वापर वाढतो़ वीज वितरण कंपनीला दरवर्षीचा हा अनुभव आहे़ त्यामुळे उन्हाळा आला की कंपनीच्या वतीने भारनियमन केले जाते़भारनियमनाला विरोध होत असला तरी विजेची वाढती मागणी आणि विजेचे उत्पादन यातील तफावत भरून काढण्यासाठी भारनियमन हा एकमेव पर्याय असल्याने महावितरण राज्यभरात भारनियमन करते़ हे भारनियमन करीत असताना ज्या काळात जास्तीत जास्त वीज वापरली जाते़ नेमकी त्याच काळात वीजपुरवठा बंद करून विजेचा अतिरिक्त वापर थांबविण्याचा प्रयत्न केला जातो़यावर्षीही उन्हाळ्यामध्ये विजेची मागणी वाढत गेली़ परंतु, मागणी तसा पुरवठाही होत असल्याने महावितरण कंपनीने भारनियमन कमी केले़ विशेष करून शहरी भागात भारनियमन करण्याचे टाळले़ त्यातच उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी देता यावे, यासाठी राज्य शासनाने भारनियमन न करण्याचे आदेश दिल्यामुळे कृषी पंपासाठीही मोठ्या प्रमाणात विजेचा वापर झाला़परभणी जिल्ह्याला वीज पुरवठा करताना महावितरण कंपनीला सर्वसाधारणपणे तीन महिन्यासाठी ९८ मिलियन युनिट (एमयुएस) वीज लागते़ उन्हाळ्यामध्ये ही मागणी वाढत जाते़ त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अधिकाºयांनी वाढती विजेची मागणी नोंदविली़ मागणी प्रमाणे पुरवठाही झाला आणि महावितरणला अधिकचा वीजपुरवठा करावा लागला़ मार्च महिन्यापासून खºया अर्थाने उन्हाळ्याची धग सुरू होते़ त्यामुळे उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घरोघरी कुलर्स, फॅनचा वापर वाढतो़ दिवसभर आणि रात्रीही कुलर्स आणि फॅनचा वापर होतो़ त्याचप्रमाणे पाणी पातळी घटत असल्याने विंधन विहिरीतून जास्तीत जास्त पाणी उपसा करण्यासाठी मोटारींचाही वापर शहरी भागात वाढला जातो़ यावर्षी जिल्ह्यात सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. जायकवाडी प्रकल्पाचे पाणी चार ते पाच वेळा सोडण्यात आले. त्यामुळे कालव्यातून पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत मोटारींचा वापर वाढला. पर्यायाने वीजेचा वापरही वाढला.मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये ३६० मिलियन युनिटस् विजेचा वापर जिल्ह्यामध्ये झाला आहे़ उन्हाळ्यातील तीन महिन्यांच्या या काळात झालेला विजेचा वापर हा सर्वसाधारणपणे घरगुती वापरासाठी झाला आहे़घरगुती वापरासाठी एका युनिटचा दर तीन रुपये एवढा आहे़ या वापरानुसार तीन महिन्यांत १९ कोटी ८० लाख रुपयांची अतिरिक्त वीज जिल्ह्याने वापरली आहे़ त्यामुळे उन्हाळ्यात अतिरिक्त विजेचा भारही जिल्ह्यातील महावितरणला सहन करावा लागला़एजन्सींमुळे कंपनीला बसतो फटकापरभणी जिल्ह्यात वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे देयक त्यांना अदा करण्यासाठी महावितरण कंपनीने एजन्सीची नियुक्ती केल्या आहेत. या एजन्सी वीज ग्राहकांच्या मीटरचे रिडींग घेतात़ रिडींगप्रमाणे बिल तयार झाल्यानंतर हे बिल ग्राहकांना वाटप करण्याची जबाबदारी एजन्सींची आहे़ परंतु, जिल्ह्यात मात्र या प्रकरणात सावळा गोंधळ असल्याचे दिसून येते़ धड मीटर रिडींग व्यवस्थित घेतली जात नाही आणि घेतलेल्या मीटर रिडींगचे बिलही वेळच्या वेळी वितरित होत नाही़ त्यामुळे चुकीची बिले मिळाल्याची ओरड वीज ग्राहकांमधून कायम होत असते़ चुकीची आलेली बिले का अदा करायची? असाही प्रश्न निर्माण होतो आणि वीज बिल भरण्यासाठी टाळाटाळ केली जाते़ तसेच अनेक वेळा वीज बिल भरण्याची तारीख निघून गेल्यानंतर ग्राहकाच्या हाती देयक दिले जाते़ यातूनही महावितरणला नुकसान सहन करावे लागत आहे़ मागील अनेक दिवसांपासून असे प्रकार सुरू असताना महावितरण कंपनी मात्र ही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी कोणतेही पावले उचलत नाही आणि ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा प्रत्येक महिन्याला फुगत असल्याने कंपनीला नुकसान सहन करावे लागत आहे़महिन्याकाठी २ कोटी युनिटचा वापरमहावितरण कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रति महिन्याला सर्वसाधारणपणे ९८ एमयूएस युनिट वीज जिल्ह्याला लागते़ ही एका महिन्यातील जिल्ह्याची सरासरी विजेची मागणी आहे़ परंतु, उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाल्यापासून विजेची मागणी वाढली़ प्रत्येक महिन्यामध्ये २२ मिलियन युनिटस् जास्तीची वीज लागली़ एका मिलियन युनिटमध्ये १० लाख युनिटचा समावेश असतो़ हा हिशोब करता महिन्याकाठी २ कोटी युनिट वीज जिल्ह्याने वापरली आहे़ तीन महिन्यांत ६ कोटी ६० लाख युनिट वीज जिल्ह्यासाठी वापरण्यात आली़ या अतिरिक्त युनिटचा प्रति युनिट ३ रुपये प्रमाणे हिशोब लावला तर १९ कोटी ८० लाख रुपयांची वीज जिल्ह्याने वापरली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण