शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अर्धवट काम करणाऱ्या गुत्तेदारांना मनपाचे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:00 IST

शहरात लाखो रुपयांची कामे अर्धवट अवस्थेत सोडणाºया कंत्राटदारांना महानगरपालिकेकडून अभय दिले जात असून याबाबत होणाºया राजकीय हस्तक्षेपाबाबत अधिकाऱ्यांनीही चुप्पी साधली आहे. परिणामी अनेक महिन्यांपासून शहरात विकासकामे प्रलंबित राहत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात लाखो रुपयांची कामे अर्धवट अवस्थेत सोडणाºया कंत्राटदारांना महानगरपालिकेकडून अभय दिले जात असून याबाबत होणाºया राजकीय हस्तक्षेपाबाबत अधिकाऱ्यांनीही चुप्पी साधली आहे. परिणामी अनेक महिन्यांपासून शहरात विकासकामे प्रलंबित राहत आहेत.महानगरपालिकेत प्रमुख पदांवर कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने विकासकामांवर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मनपाच्या वतीने करण्यात येत आहेत;परंतु, या कामाची देखरेख ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या अभियंत्याकडून केली जात आहे. परिणामी होणाºया कामांची स्थिती दयनीय आहे. सदरील कामे करणाºया कंत्राटदारांची मनपातील पदाधिकाºयांसोबत उठबैस असल्याने त्यांच्याकडून अर्धवट कामे सोडून देण्यात आली तरी कोणीही संबंधित कंत्राटदारांना चकार शब्द काढत नाही. त्यामुळे अनेक महिन्यांपासून ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशीद या कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याचे काम २०१६ मध्ये सुरु करण्यात आले होते. यासाठी निधीची तरतूदही मुबलक प्रमाणात उपलब्ध होती; परंतु, सदरील कंत्राटदाराने हे काम पूर्णच केले नाही. जवळपास साडेतीन वर्षानंतरही हे काम अर्धवटच आहे. या रस्त्यांच्या दुभाजकांचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुुंना असलेल्या नाल्यांवरील ढाप्याचे तसेच एका बाजूच्या नालीचे कामही पूर्ण करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे हे काम एकाच कंत्राटदाराला दिलेले असताना त्याचे तुकडे करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा या दरम्यान एका कंत्राटदाराने तर त्यापुढील काम दुसºयाच कंत्राटदाराने केले. विशेष म्हणजे, दोन्ही कामांच्या दर्जामध्ये व मोजमापांममध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. असे असताना संबधितांना पुर्ण कामाचे बिल अदा करण्यात आले आहे. याकडे मनपाच्या अधिकारी व पदाधिकाºयांना लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही. अशीच अवस्था महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाची आहे. या पुतळ्याच्या निर्मितीचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी काम अर्धवट असतानाच महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा झाला. आता विधानसभेच्या निवडणुका होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे; परंतु, सदरील कंत्राटदाराला हे काम पूर्ण करणे गरजेचे वाटलेले नाही. शहरातील वसमत रोड ते अक्षदा मंगल कार्यालयापासून कृषी विद्यापीठ रेल्वेगेट या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यामुळे हे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाच वसमतरोड ते अक्षदा मंगल कार्यालय एवढेच काम पूर्ण करण्यात आले. त्यापुढील रस्त्याचे काम अर्धवट सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे, या रस्त्याचा निधी इतरत्र वळविण्यात आला. परिणामी, आजही या रस्त्याची दयनीय स्थिती आहे. शहरातील लोकमान्य नगरातही रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट सोडून देण्यात आले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी सातत्याने मनपाकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रातिनिधिक स्वरुपात ही काही उदाहरणे असली तरी अन्यही काही कामेही संबंधित कंत्राटदारांनी अर्धवट सोडली आहेत.विशेष म्हणजे, अडीच वर्षापूर्वी ज्या कंत्राटदारांना तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांनी काळ्या यादीत टाकले होते, त्याच कंत्राटदारावर सध्या मनपात चांगलीच मेहरबानी दाखविली जात आहे. असे असताना अधिकारी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.दरम्यान, शहरातील बसस्थानका शेजारील अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा ते नीरज हॉटेल या रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. सदरील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्यावर खड्डे पडले आहेत.नांदखेडा रस्त्याच्या अर्धवट सोडलेल्या कामाला लागला मुहूर्त४शहरातील नानलपेठ कॉर्नर ते बेलेश्वर मंदिर या दरम्यानच्या रस्त्याचे काम मनपाच्या वतीने मंजूर करण्यात आले होते. हा रस्ताही वर्दळीचा असल्याने व अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने त्याच्या डांबरीकरणाचे काम वेगाने होण्याची अपेक्षा होती; परंतु, मनपाच्या अधिकारी-पदाधिकाºयांचा धाक नसल्याने सदरील कंत्राटदाराने हे काम पारदेश्वर मंदिरापर्यंतच केले. त्यापुढील काम अर्धवट सोडून देण्यात आल्याने नांदखेडा येणाºया वाहनधारक व नागरिकांना त्याचा चांगलाच त्रास सहन करावा. अनेक दिवसानंतर गुरुवारपासून पुन्हा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यापुढे पुन्हा हे काम बंद पडणार नाही, याची मनपाच्या अधिकाºयांनी काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका