शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : हजार पुरुषांमागे ९२४ महिला मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:49 IST

लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्याच्या मतदार यादीचे पुनर्रिक्षण करण्यात आले असून, त्यात १ हजार पुरुष मतदारांच्या मागे ९२४ महिला मतदारांचा समावेश झाला आहे़ तसेच या मतदार यादीमध्ये ५३ हजार ८५२ नवीन मतदारांची वाढ झाली असून, ३१ जानेवारी रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्याच्या मतदार यादीचे पुनर्रिक्षण करण्यात आले असून, त्यात १ हजार पुरुष मतदारांच्या मागे ९२४ महिला मतदारांचा समावेश झाला आहे़ तसेच या मतदार यादीमध्ये ५३ हजार ८५२ नवीन मतदारांची वाढ झाली असून, ३१ जानेवारी रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी दिली़या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले उपस्थित होते़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर म्हणाले, मतदार यादीचा पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविला़ त्यात मयत, स्थलांतरित व दुबार असलेली नावे वगळण्यात आली असून, नवीन मतदारांचीही यादीमध्ये नोंदणी झाली आहे़ त्यानुसार ५३ हजार ८५२ मतदार वाढले आहेत़ जिल्ह्यात आता १३ लाख ७६ हजार १५१ मतदार यादीत समाविष्ट झाले असून, त्यामध्ये ७ लाख १५ हजार २४९ पुरुष आणि ६ लाख ६० हजार ८९१ महिला मतदारांचा समावेश आहे़ १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमध्ये महिला मतदारांचे पुरुष मतदारांशी हजारी प्रमाण ९२२ एवढे होते़ नवीन यादीत दोनने वाढ झाली असून, दर हजारी पुरुषांमागे ९२४ मतदार असे गुणोत्तर असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली़ त्याच प्रमाणे मतदार यादीतील मयत, स्थलांतरित, दुबार नावे असलेली अशी सुमारे ९ हजार ७१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत़ अपंग मतदारांची विशेष नोंदणी करण्यात आली असून, २ हजार ९५० अपंग मतदारांची नोंदणी झाली आहे़निवडणुकीसाठी १० हजार १३० कर्मचाºयांची आवश्यकता असून, प्रशासनाकडे १५ हजार ५६७ कर्मचारी उपलब्ध आहेत़ यावर्षी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करून मतदान होणार असून, डिसेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या जनजागृती अंतर्गत ८९ हजार ४८६ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून पाहिले आहे़टोल फ्री क्रमाक केला उपलब्धमतदार यादीतील नावे आणि निवडणूक विषयक कामांसंदर्भात जिल्हा प्रशासनाने १९५० हा टोल फ्री क्रमांक मतदारांसाठी उपलब्ध करून दिला आहे़ या क्रमांकावर फोन करून मतदारांना यादीतील त्यांचे नाव, मतदान केंद्राची खात्री करून घेता येणार आहे़मोबाईल अ‍ॅपही होणार कार्यान्वितयंदाच्या निवडणुकीसाठी मतदारांना वापरण्यासाठी सी व्हिजील हे मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे़ आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे अ‍ॅप मतदारांना वापरता येणार आहे़ आचारसंहिता भंग होत असेल तर अशा ठिकाणचे फोटो, व्हिडीओ अ‍ॅपवर टाकून मतदारांना संबंधितांची तक्रार करता येणार आहे़, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारी