शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

परभणी : ५९६ बालके गंभीर कुपोषणातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:51 IST

महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या ग्राम बालविकास केंद्र या विशेष मोहिमेमुळे १ हजार ९७ कुपोषित बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असल्याची माहिती या विभागाने दिली आहे़ विशेष म्हणजे, या मोहिमेत ४२६ बालकांना गंभीर कुपोषणातून मध्यम स्थितीत आणण्यातही विभागाला यश मिळाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या ग्राम बालविकास केंद्र या विशेष मोहिमेमुळे १ हजार ९७ कुपोषित बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असल्याची माहिती या विभागाने दिली आहे़ विशेष म्हणजे, या मोहिमेत ४२६ बालकांना गंभीर कुपोषणातून मध्यम स्थितीत आणण्यातही विभागाला यश मिळाले आहे़सकस आहार न मिळाल्याने बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण जिल्ह्यातही अधिक आहे़ अशा बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने मोहीम राबविली जाते़ महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वीच कुपोषण निर्मूलन उपक्रम हाती घेतला होता़ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़ पी़ पृथ्वीराज यांनी जिल्ह्यात ‘शून्य कुपोषण’ हे अभियान सुरू केले़ अभियानाच्या प्रारंभीच ग्रामीण भागात सर्वेक्षण करून कुपोषित बालकांचा शोध घेण्यात आला़ तेव्हा जिल्हाभरात १ हजार ९६ बालके कुपोषित असल्याची बाब समोर आली़ त्यानंतर या बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने प्रयत्न सुरू केले़ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले़ जिल्ह्यातील २८५ केंद्रांमधून या बालकांना संतुलित आहार देण्याचे प्रयत्न सुरू झाले़साधारणत: जुलै महिन्यात महिला व बालविकास विभागाने हे अभियान राबविले़ या अभियानाचा परिणाम दीड महिन्यातच दिसून आला़ जिल्ह्यात दाखल झालेल्या १ हजार ९७ बालकांना दररोज संतुलित आहार देणे, त्यांचे वजन घेणे, आरोग्य तपासणी करणे असे उपक्रम राबविण्यात आले़ त्यात जिल्हाभरातील विविध केंद्रांत दाखल झालेल्या बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असून, ४२६ बालके मध्यमस्थितीत आली आहेत़ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ कैलास घोडके यांनी सुक्ष्म नियोजन केले़ महिला व बालकल्याण सभापती राधाबाई सूर्यवंशी यांनी वेळोवेळी केंद्रांना भेटी देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्देश दिले़ त्यामुळेच कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मदत झाली, असे डॉ़ घोडके यांनी सांगितले़घरोघरी ठेवा बाळ कोपराबालकांमध्ये मुळातच खाण्याची आवड असते़ त्यांना थोड्या थोड्या वेळाने काही तरी खायला लागते. तेव्हा प्रत्येक पालकांनी आपल्या घरात मुरमुरे, शेंगदाणे लाडू, खजूर, गुळपट्टी असे पदार्थ भरणीमध्ये भरून ठेवावीत़ हे पदार्थ मुलांना सहज हाताला येतील, अशा पद्धतीने ठेवावीत, असे आवाहन जि.प. तर्फे करण्यात आले आहे.२८५ केंद्रांतून बालकांची देखभालकुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात २८५ ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले़ त्यात गंगाखेड तालुक्यात १७, पाथरी ४१, परभणी २९, जिंतूर ६१, पालम ३१, पूर्णा २७, सेलू ३८, मानवत २९ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १२ केंद्र सुरू करण्यात आले़ या अंगणवाडी केंद्रात दाखल झालेल्या बालकांना जुलै महिन्यापासून दररोज सात वेळा नियमितपणे अमायलेज युक्त आहार देण्यात आला़ तसेच गरजेनुसार औषधी देण्यात आली़ यासाठी सेविकांना प्रती बालक प्रती दिवस २५ रुपये या प्रमाणे निधीही उपलब्ध करून दिला़ वैद्यकीय अधिकाºयांमार्फत १५ दिवसांना बालकांची तपासणी करण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषदfoodअन्नGovernmentसरकार