शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मतदार यादीत ५१ हजार दुबार नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:42 IST

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात ५१ हजार ९६० मतदारांची नावे दोन वेळा असून, ही नावे मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात ५१ हजार ९६० मतदारांची नावे दोन वेळा असून, ही नावे मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़परभणी जिल्ह्यातील मतदारांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे़ दोन दिवसांपूर्वी मतदार यादीमधील नावांत काही आक्षेप असतील तर तेही प्रशासनाने दाखल करून घेतले आहेत़ दरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले असून, जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात एकाच व्यक्तीचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक नावे असलेले ५१ हजार ९६० मतदार असल्याची गंभीर स्वरुपाची तक्रार केली आहे़ जिंतूर विधानसभा मतदार संघात १३ हजार ९५२ मतदारांची नावे दुबार आहेत़ तसेच परभणी विधानसभा मतदार संघामध्ये ८ हजार ७८०, गंगाखेड विधानसभा मतदार संघात १७ हजार २९५, पाथरी विधानसभा मतदार संघामध्ये १० हजार ५९० मतदारांची नावे एकापेक्षा अधिक वेळा आहेत़ ही बाब गंभीर स्वरुपाची असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याचे जिल्हा काँगे्रसच्या वतीने प्रशासनाला सांगण्यात आले़ दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दुबार असलेली नावे यादीतून वगळावीत, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपूडकर, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, उपमहापौर माजू लाला, सभागृह नेते भगवान वाघमारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख, श्रीनिवास पेदापल्ली, असलम भाई आदींनी केली आहे़ दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हास्तरावरील निवडणूक विभाग या प्रश्नी कोणती भूमिका घेतो याकडे जिल्हावसियांचे लक्ष लागले आहे़