शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

परभणी : निवासस्थानाचे ५० लाख वळविण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:07 IST

जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाºयांच्या निवासस्थानासाठी तरतूद करण्यात आलेला ५० लाख रुपयांचा निधी इतरत्र वळविण्याच्या हालचाली जि़प़तील काही पदाधिकाºयांनी सुरू केल्याने निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाºयांच्या निवासस्थानासाठी तरतूद करण्यात आलेला ५० लाख रुपयांचा निधी इतरत्र वळविण्याच्या हालचाली जि़प़तील काही पदाधिकाºयांनी सुरू केल्याने निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत़जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाºयांसाठी शहरातील प्रशासकीय इमारतीच्या बाजुला निवासस्थाने उभारण्यात आली आहेत़ जवळपास ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या निवासस्थानांची सध्या दुरवस्था झाली आहे़ असे असले तरी येथे जवळपास ३२ कर्मचाºयांचे कुटूंबिय राहतात़ दर अडीच वर्षाला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बदलल्यानंतर त्यांच्या निवासस्थानांची डागडुजी केली जाते़ शिवाय नवीन अधिकाºयांचीही नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याही निवासस्थानांची तातडीने डागडुजी केली जाते़ परंतु, गेल्या ३० वर्षांपासून वर्ग ३ व ४ च्या या कर्मचाºयांच्या निवासस्थानांची डागडुजी झालेली नाही़ त्यामुळे येथील दुरवस्थेत भर पडली आहे़ ही बाब गतवर्षी येथील कर्मचाºयांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कानावर घातली होती़त्यावेळी खोडवेकर यांनी नवीन इमारत बांधकामासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद जि़प़च्या अर्थसंकल्पात केली होती़ नवीन निवासस्थाने बांधण्यासाठी हा निधी पुरेसा नसल्याचे कारण सांगून त्यावर पुढे कारवाई झाली नाही़ खोडवेकर यांची बदली झाल्यानंतर हा विषय अडगळीत पडला़ आता या निवासस्थानांसाठी तरतूद करण्यात आलेला ५० लाख रुपयांचा निधी रस्ते किंवा अन्य इमारतींच्या दुरुस्तीसाठी खर्च करता येतो का? याबाबतची काही पदाधिकाºयांनी पडताळणी केली़ त्यामध्ये अधिकाºयांना हाताशी धरून मार्ग काढण्याचा प्रयत्नही झाला़ त्यानंतर आता हा निधी इतरत्र वळविण्यासाठी काही पदाधिकाºयांनी चांगलीच खटाटोप सुरू केली आहे़ परिणामी कर्मचाºयांच्या निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबितच राहतो की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे़अधिकारी-पदाधिकाºयांच्या कक्षांची दुरुस्तीजिल्हा परिषदेत अधिकारी व पदाधिकाºयांच्या कक्षांची दुरुस्ती करण्याचे काम सातत्याने सुरू आहे़ तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकर यांनी अधिकार मर्यादा ओलांडून तब्बल १० लाख रुपये खर्च करून त्यांच्या कक्षाची दुरुस्ती केल्याचा आरोप जि़प़ सदस्यांनी केला होता़ तसेच काही महिन्यांपूर्वी जि़प़चे कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी त्यांचा कक्ष सोडून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षात ठाण मांडले़ त्यावेळी त्यांच्या कक्षाचीही दुरुस्ती करण्यात आली़त्यानंतर कृषी सभापतींसाठी पूर्वी असलेला कक्ष पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मुळीक यांना देण्यात आला़ त्यांच्या कक्षाचीही डागडुजी झाली़ विरोधी पक्षातील सदस्यांसाठी एक कक्ष देण्यात आला़ त्याचीही तातडीने डागडुजी झाली़ आता सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़व्ही़ करडखेलकर यांच्या कक्षाची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे़यासाठी जवळपास साडेचार लाख रुपयांचा निधी लागणार असल्याची चर्चा आहे़ त्यामुळे एकीकडे अधिकारी व पदाधिकाºयांच्या कक्षांवर लाखो रुपये डागडुजीसाठी खर्च केले जात असताना कर्मचाºयांच्याच निवासस्थानासाठी निधी का उपलब्ध करून दिला जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे़