शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

परभणी : चार जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:07 AM

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी २८ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ४ जागासाठी ५३ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. पुढील १२ दिवस या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी २८ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ४ जागासाठी ५३ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. पुढील १२ दिवस या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु राहणार आहे.परभणी विधानसभा मतदारसंघातील १२ इच्छुक उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली. त्यामध्ये विखार अहेमद खान, हेमंत भगवानराव साळवे, शेख शकुर शेख इस्माईल, जाकेर अहेमद खान, मोईन अहेमद खान, शेख सलीम शेख इब्राहीम, अख्तर खान अहेसान उल्ला खान, अरुण बाबुराव पवार, अ.सत्तार अ.अजीज शेख, स.शाकेर स.अहेमद, मोईन अहेमद अ.खादर, सुभाष अशोक अंभोरे, निहाल अहेमद कौसडीकर यांचा समावेश आहे. आता येथे एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात राहिले आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे आ.डॉ.राहुल पाटील, काँग्रेसचे रविराज देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे मोहम्मद गौस झैन, बहुजन समाज पार्टीच्या प्रतिभा प्रमोद मेश्राम, मनसेचे सचिन भीमराव पाटील, एमआयएमचे अली खान मोईन खान, प्रहार संघटनेचे शिवलिंग महादप्पा बोधने, बहुजन मुक्ती पार्टीचे विनोद अण्णा भोसले, अपक्ष अ‍ॅड.अफजल बेग साहब, अब्दुल जमीर जम्मू, शेख अली शेख नबी, गोविंद रामराव देशमुख, शमीम खान नसीम खान, सुरेश कुंडलिक नागरे आणि संगिता प्रभाकर जगाडे यांचा समावेश आहे.गंगाखेड मतदारसंघातून ८ इच्छुकांनी अर्ज परत घेतले. त्यामुळे येथे १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी परत घेतलेल्यांमध्ये त्र्यंबक मुरकुटे, अभय कुंडगीर, बाळासाहेब निरस, भरत घनदाट, राजाभाऊ फड, धन्यकुमार शिवणकर, सविता मुरकुटे आणि संजय कदम यांचा समावेश आहे. आता येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.मधुसूदन केंद्रे, शिवसेनेचे विशाल कदम, रासपचे रत्नाकर गुट्टे, वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडगीर, बहुजन विकास आघाडीचे गजानन गिरी, बसपाचे देवराव खंदारे, मनसेचे विठ्ठलराव जवादे, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे सखाराम बोबडे, अपक्ष सीताराम घनदाट, बालाजी सगर, तुकाराम वाव्हळे, शेख अजहर, गजानन मरगीळ, संजीव प्रधान आणि संतोष मुरकुटे यांचा समावेश आहे.पाथरी विधानसभा मतदारसंघात सोमवारी चार उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले. त्यामध्ये डॉ.राम शिंदे, प्रा. प्रल्हाद पाटील, मुंजाजीराव कोल्हे, डॉ.संजय कच्छवे यांचा समावेश आहे. आता निवडणुकीच्या आखाड्यात एकूण १० उमेदवार राहिले आहेत. त्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे गौतम वैजनाथराव उजगरे, भारतीय जनता पार्टीचे आ.मोहन फड, काँग्रेसचे सुरेश वरपूडकर, आंबेडकर राईट रिपब्लिकन पार्टीचे अजय सोळंके, बहुजन मुक्ती पार्टीचे मोईज अन्सारी अब्दुल कादर, वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर, अपक्ष नारायण चव्हाण, डॉ.जगदीश श्ािंदे, जयजयराम विघ्ने आणि मुजीब आलम बद्रे आलम यांचा समावेश आहे.जिंतूर विधासभा मतदारसंघात अखेरच्या दिवशी चार जणांनी आपले अर्ज परत घेतले. त्यामध्ये माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, खंडेराव आघाव, कुरेशी आवेश जिलानी आणि स.दिलावर स.जमाल सहाब यांचा समावेश आहे. आता येथे निवडणुकीच्या आखाड्यात एकूण १३ उमेदवार राहिले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे विजय भांबळे, भाजपाच्या मेघना बोर्डीकर, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वाकळे, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे अंकुश सीताराम राठोड, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र घनसावध, संभाजी ब्रिगेड पार्टीचे बालाजी शिंदे, आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे महेंद्र काळे, बहुजन महापार्टीचे दिनकर गायकवाड, अपक्ष राम खराबे, स.जावेद स.आमेर हाश्मी, राजेश भिसे, देवानंद रतत्ने, ज्ञानेश्वर दाभाडे यांचा समावेश आहे.दरम्यान, चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना सोमवारी दुपारी ३ वाजेनंतर चिन्हांचे वाटप करण्यात आले.प्रचारासाठी : १२ दिवसांचाच कालावधी४उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता ८ ते १९ आॅक्टोबर या कालावधीत उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार आहे. त्यामुळे पुढील १२ दिवसात जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.४यानिमित्त देश व राज्य पातळीवरील विविध पक्षांतील नेत्यांच्या जाहीर सभा होणार असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. या निवडणुकीत अनेक उमेदवार पहिल्यांदाच उतरले असून काही दिग्गज उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत. त्यामध्ये कोणाला यश मिळेल, हे २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.सर्वात कमी उमेदवार पाथरीत४जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे १० उमेदवार पाथरी विधानसभा मतदारसंघात राहिले आहेत. सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी १५ उमेदवार गंगाखेड व परभणी मतदारसंघात राहिले असून जिंतूर विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार राहिले आहेत.पाच वर्षानंतर आघाडी आणि महायुती रिंगणात४२०१४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्ररित्या लढविली होती. यामध्ये राष्ट्रवादीला २ तर शिवसेनेला एका जागी व अपक्ष उमेदवारास एका जागी यश मिळाले.४आता राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली असून शिवसेना- भाजपाची युती झाली आहे. काँग्रेस परभणी व पाथरीची तर राष्ट्रवादी जिंतूर व गंगाखेडची जागा लढवत आहे.४शिवसेना परभणी व गंगाखेडची तर भाजप जिंतूर आणि पाथरीची जागा लढवत आहे. याशिवाय यावर्षी पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून या आघाडीचे उमेदवार चारही मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019