शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : २९ लाखांचे कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:16 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्र्गत १० डिसेंबरपर्यंत ४० शेतकऱ्यांना २९ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना हक्काचा पैसा उपलब्ध झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्र्गत १० डिसेंबरपर्यंत ४० शेतकऱ्यांना २९ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना हक्काचा पैसा उपलब्ध झाला आहे.आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने सुगीच्या काळात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला जातो. परिणामी बाजारभाव कमी होतात. शेतमालास योग्य भाव न मिळाल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. काढणी हंगामात शेतमालाची साठवणूक करून काही कालावधीनंतर तो बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास ज्यादा भाव मिळू शकतो. शेतकºयांना सुगीच्या काळात असलेली आर्थिक निकड लक्षात घेऊन गरजेच्या वेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळ शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.मानवत बाजार समितीनेही या योजनेची अंमलबजावणी केली असून शेतमाल तारण ठेवल्यास बाजार भावानुसार सहा महिन्यांच्या मुदतीसाठी ६ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. या कर्जाचा भरणा १८० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. चालू वर्षाचा सातबारा, शेतमालाचे पीकपेरा पत्र, १०० रुपयांचा बॉम्ड आदी कागदपत्र जमा करून बाजार समितीकडे सादर केल्यास कर्ज उपलब्ध करून दिले जाते. १० आॅक्टोबर ते १० डिसेंबर या काळात बाजार समितीकडे ४० शेतकºयांनी २ हजार २५५ सोयाबीन कट्टे तारण ठेवले असून या शेतकºयांना २९ लाख ६४ हजार ३०० रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी पणन मंडळाने १७ लाख ३४ हजार रुपये उपलब्ध करून दिले असून उर्वरित १२ लाख रुपये बाजार समितीने उपलब्ध केले आहेत.६ टक्के व्याज दराने कर्जया योजनेंतर्गत बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के रक्कम सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ६ टक्के व्याज दराने तारण कर्ज म्हणून दिली जाते. ही योजना पणन मंडळाच्या स्वनिधीतून बाजार समित्यांमार्फत राबविली जाते. सहा महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाºया बाजार समित्यांना ३ टक्के व्याज सवलत पणन मंडळाकडून दिली जाते. तसेच ज्या बाजार समित्या स्वनिधीतून कर्ज योजना राबवितात त्या बाजार समित्यांना वाटप केलेल्या कर्जरकमेवर ३ टक्के व्याज सवलत अनुदान स्वरुपात दिले जाते.कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने शेतमाल तारण ठेऊन नाममात्र ६ टक्के दराने सहा महिने मुदतीचे कर्ज बाजार समितीने उपलब्ध करून दिले आहे. शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा.-गंगाधरराव कदम,सभापती कृऊबा, मानवतशेतमाल तारण योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या शेतकºयांना १८० दिवसांच्या आत कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. शेतकºयांची निकड लक्षात घेऊन बाजार समितीने ही योजना सुरू केली आहे.-शिवनारायण सारडा,प्रभारी सचिव

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती