शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ग्रामीण रुग्णालयातील २५ पदांना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:14 IST

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सोनपेठ शहरात ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले आहे. मात्र पदांची भरती झाली नसल्याने उद्घाटनही झाले नाही. ६ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालयासाठी आरोग्य विभागाने २५ पदांना मान्यता दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सोनपेठ शहरात ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले आहे. मात्र पदांची भरती झाली नसल्याने उद्घाटनही झाले नाही. ६ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालयासाठी आरोग्य विभागाने २५ पदांना मान्यता दिली आहे.सोनपेठ तालुक्यात ६५ गावांचा समावेश आहे. या गावातील रुग्णांच्या उपचारासाठी शहरात केवळ एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याचबरोबर तालुक्यातील शेळगाव, वडगाव, डिघोळ ई., शिर्शी बु., लासीना, कान्हेगाव, खडका, नरवाडी, आवलगाव, उखळी बु., धामोणी या ठिकाणी १० उपकेंद्र आहेत. यामध्ये सामान्य रुग्णांना प्रथमोपचार मिळतो; परंतु, गंभीर रुग्णांना मात्र उपचारासाठी परळी, अंबाजोगाई व परभणीसारख्या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुुळे सोनपेठ तालुक्यासाठी एक ग्रामीण रुग्णालय व्हावे, यासाठी सामाजिक व राजकीय शक्तींनी पाठपुरावा करून रुग्णालय मंजूर करून घेतले. ३ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीतून इमारतही उभारण्यात आली; परंतु, या इमारतीत लागणाऱ्या वेगवेगळ्या पदांची मान्यताच शासनाने दिली नव्हती. त्यामुळे रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही रुग्णालयाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.६ जूनच्या एका शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालयासाठी २५ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. नियमित १० पदांना मंजुरी देण्यात आली असून वैद्यकीय अधीक्षक १, वैद्यकीय अधिकारी ३, अधिपरिचारिका ३, भांडारपाल, मिश्रक व कनिष्ठ लिपिक यांचे प्रत्येकी १ पद तसेच कुशल पदांमध्ये अधिपरिचारिकांची ४ पदे, क्ष-किरण तंत्रज्ञ १, प्रयोगशाळा सहाय्यक १, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, कनिष्ठ लिपिक १, शिपाई १ व कक्षसेवक ४, त्याचबरोबर अकुशल पदांमध्ये सफाई कामगारांच्या २ पदांना मान्यता दिली आहे. ग्रामीण रुग्णालयासाठी पदांंना मान्यता दिली तरी ही पदे लवकरात लवकर भरती करून रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी करून ग्रामीण रुग्णालय सुुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.ुरुग्णांची होणारी गैरसोय थांबवावीसोनपेठ तालुक्यात केवळ एक प्राथमिक केंद्र असून १० उपकेंद्र आहेत. या ठिकाणी केवळ प्राथमिक उपचार केले जातात. त्यामुळे गंभीर रुग्णांना आर्थिक झळ सहन करीत परजिल्ह्यातील दवाखाना गाठावा लागतो. त्यामुळे आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन करुन रुग्णांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल