शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

परभणी : घरकुलासाठी आणखी ५६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:28 IST

शहरातील रमाई घरकुल आणि प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले असून शासनाने या योजनेसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील रमाई घरकुल आणि प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले असून शासनाने या योजनेसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली.शहरातील जलपूनर्भरण आणि वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या सभागृहात नागरिकांसमवेत बैठक पार पडली. यावेळी आयुक्त रमेश पवार, आरोग्य सभापती सचिन देशमुख, डॉ. राजगोपाल कालानी, शंकर आजेगावकर, डॉ. रविंद्र केंद्रेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिजीत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.या बैठकीत बोलताना आयुक्त रमेश पवार म्हणाले, परभणी शहरामध्ये रमाई घरकुल योजनेचे ४५ कोटी रुपये पडून होते. यावर्षी १ हजार ९०० घरकुलांना मंजुरी देऊन या पैशांचा विनियोग केला. त्यामुळे शासनाने पुन्हा ५६ कोटी रुपये दिले आहेत. परिणामी ही योजना यशस्वी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात एकूण ७० हजार मालमत्ता असून त्यापैकी ५० हजार मालमत्तांवर येत्या वर्षभरात जलपूनर्भरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेला यावर्षी अडीच हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. मनपाने आतापर्यंत १० हजार झाडे लावली आहेत. बांधकाम परवानगीच्या वेळी जलपुनर्भरणाची अट घालण्यात आली आहे. रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचा शेवटचा हप्ता देण्यापूर्वी जलपूनर्भरण व वृक्षलागवड केली असल्यासच हा हप्ता दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. यापुढेही शहरामध्ये वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती करुन वृक्ष लावली जाणार आहेत. नागरिकांनी आपल्या घरासमोर किमान दोन झाडे लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी डॉ.राजगोपाल कालानी, शंकर आजेगावकर, डॉ. रवींद्र केंद्रेकर, संजय ठाकरे, उद्यान निरीक्षक पवन देशमुख, मोहम्म अथर, बचतगटातील महिला सदस्या लता गायकवाड, अन्नपूर्णा मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकूंद कुलकर्णी, संकीर्ण विभागप्रमुख राजकुमार जाधव, पवन देशमुख, मो.अथर, पंकज देशमुख, सुभाष मस्के, पठाण आदींनी प्रयत्न केले.वृक्षारोपणासाठी : मोकळ्या जागांचा होणार वापर४परभणी शहरात वृक्षारोपण मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. महानगरपालिकेने दिलेले उद्दिष्ट केव्हाच पूर्ण केले आहे. यापुढेही शहरामध्ये वृक्षारोपण सुरुच राहणार आहे. महापालिकेच्या अंतर्गत डॉ.अंकिरा वाकी यांच्या संकल्पनेतून माऊली गार्डन येथे झाडे लावली जात आहेत. या ठिकाणी ७२१ झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच शहरातील चारही उद्यांनाबरोबरच जिंतूररोडवरील नवीन दत्तनगर, युसूफ कॉलनी, मुमताजनगर, दर्गारोड या ठिकाणी झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.४शहरामध्ये संरक्षित भिंत असलेल्या ज्या मोकळ्या जागा आहेत, त्या जागाही झाडे लावण्यासाठी वापरल्या जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त रमेश पवार यांनी दिली. शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन लावले आहे. दररोज शहरातील संपूर्ण कचरा उचलला जात असून घनकचºयाचे व्यवस्थापन करणारा प्रकल्प उभारणीचे काम जवळपास पूर्णत्वाला आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर शहरामध्ये सर्व रस्त्यांवर एलईडी लाईट बसविले असून असे काम करणारी परभणी मनपा एकमेव असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार