शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

परभणी: वर्षभरात ११०० नैसर्गिक प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:27 IST

येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेत आपला वेगळा ठसा उमटविला असून वर्षभरात ११३३ नैसर्गिक प्रसुती झाल्या. तर १२८ सिझर करुन सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

मोहन बोराडे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेत आपला वेगळा ठसा उमटविला असून वर्षभरात ११३३ नैसर्गिक प्रसुती झाल्या. तर १२८ सिझर करुन सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा मागील एक वर्षाचा आढावा घेतला असता या रुग्णालयात विविध सेवा देण्यात येतात. त्यामुळे सेलू तालुक्यासह परतूर, माजलगाव, मंठा, सातोना, आष्टी यासह जालना जिल्ह्यातील काही गावांमधील गर्भवती महिला प्रसुतीसाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होतात. अनेक गर्भवती महिलांचे सिझर करण्याची गरज निर्माण होते. अशावेळी सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना खाजगी दवाखान्यात सिझर करण्यासाठी किमान ३५ ते ४० हजार रुपयांचा खर्च लागतो. हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात गरजू गर्भवती महिलांच्या औषधींचा किरकोळ खर्च वगळता सिझर करण्यासाठी परभणी येथून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.शरद वाघ, भूलतज्ज्ञ डॉ. प्रशांत पाचलेगावकर, सर्जन डॉ.अर्जून पवार यांना पाचारण करुन सिझर केले जाते. विशेष म्हणजे ही सुविधा तालुकास्तरावरील रुग्णालयात मिळत असल्याने सेलू येथील रुग्णालयात गर्भवती महिलांची संख्या उपचारासाठी वाढली आहे. या रुग्णालयात नैसर्गिक प्रसुतीचे प्रमाणही अधिक आहे. त्याच बरोबर वर्षभरात महिलांच्या गर्भपिशवीच्या २८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच बिनटाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया ९७ करण्यात आल्या असून उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर लहान मुलांच्या ८२ शस्त्रक्रिया वर्षभरात झाल्या आहेत.रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्रामधून १०४ रुग्णांना वेळीच मदत करण्यात आली आहे. रुग्णालयात ७ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. वर्षभरात १०३८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारलेले उद्यान तसेच बालउद्यान हे आकर्षण ठरत आहे.एकंदरीत जिल्ह्यातील इतर रुग्णालयांच्या बाबतीत विचार केला असता सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयावर रुग्णांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे.रुग्णालयाला मिळाले दोन पुरस्कार४ सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. दररोज तीनवेळा रुग्णालयात साफसफाई केली जाते. गरजू रुग्णांसाठी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णालयाला सलग दोन वर्षे डॉ.आनंदीबाई जोशी पुरस्कार तसेच कायाकल्प पुरस्कार मिळाल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांनी दिली. त्याच बरोबर वर्षभरात मुलींचा जन्मदरही समाधानकारक असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटलWomenमहिला