शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

परभणी : हरभरा विक्रीचे दहा लाख रुपये झाले जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:34 IST

जिल्हा मार्केटिंग व विदर्भ फेडरेशनच्या वतीने सुरू केलेल्या येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत १७ शेतकºयांच्या खात्यावर १० लाख रुपये जमा झाल्याची माहिती खरेदी विक्री संघाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी ): जिल्हा मार्केटिंग व विदर्भ फेडरेशनच्या वतीने सुरू केलेल्या येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत १७ शेतकºयांच्या खात्यावर १० लाख रुपये जमा झाल्याची माहिती खरेदी विक्री संघाने दिली.तालुक्यात मागील काही वर्षांपासून सोयाबीन, तुरी पाठोपाठ हरभºयाचे उत्पादन होत आहे. यावर्षीच्या रबी हंगामात ५ हजार ६० हेक्टवर हरभºयाचा पेरा करण्यात आला. कमी पाणी पाळ्यामध्ये पीक हाती येत असल्याचे त्याचे लागवड क्षेत्र गव्हाच्या तुलनेत वाढले आहे. यावर्षी शेतकºयांनी हरभºयाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले होते. शासनाचा हमीभाव ४ हजार ४४० रुपये असताना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा एक ते दीड हजार कमी मिळत असल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे हमीभाव केंद्रावर हरभरा विक्री करण्याशिवाय शेतकºयांसमोर पर्याय राहिला नव्हता. २१ मार्च २०१८ पासून येथील खरेदी विक्री संघात आॅनलाईन नोंदणी सुरू झाली. ३ मे २०१८ पासून बाजार समिती परिसरात काटा सुरू करून हरभºयाची खरेदी सुरू करण्यात आली. आॅनलाईन हरभरा विक्रीसाठी तालुक्यातील १२९३ शेतकºयांनी खरेदी विक्री संघात नोंद केली होती. मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत ६५३ शेतकºयांचा ८ हजार ७८३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. शेतकºयांचा हरभरा खरेदी केल्यानंतर सुमारे ४६८ शेतकºयांचे ६ हजार २०८ क्विंटलचे २ कोटी ७३ लाख रुपये थकले होते. तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही कष्टाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले. आठ दिवसांत आरटीजीएसद्वारे शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आदेश असताना ही रक्कम मिळत नसल्याने शेतकºयांना उसणवारी करावी लागली. यंदाच्या हंगामातील नवीन हरभºयाची पेरणी झाल्यानंतर हमीभाव केंद्रावर माल विक्री केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. १७ आॅक्टोबरपर्यंत १० लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे ४५८ शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.तुरीचे ४६ लाख रुपये थकलेशासकीय हमीभाव केंद्रावर विदर्भ को.आॅप. फेडरेशनच्या वतीने ९ फेब्रुवारीपासून तूर खरेदीला सुरुवात झाली. तूर विक्रीसाठी तालुक्यातील ३ हजार १५० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. यातील केवळ ८४४ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली. ६० तूर उत्पादक शेतकºयांचे ८४९ क्विंटल तुरीचे ४६ लाख २६ हजार रुपये थकले आहेत. नोंदणी केलेल्या मात्र तूर विक्री करता न आलेल्या शेतकºयांंसाठी राज्य सरकारने अनुदान जाहीर केले आहे. मात्र प्रत्यक्षात हे अनुदान कधी मिळणार? याची शेतकºयांना प्रतीक्षा लागली आहे.हमीभाव केंद्रावर तूर, हरभरा विक्री केलेल्या शेतकºयांची थकलेली रक्कम अदा करावी, अशी मागणी शेतकरी सुकाणू समितीने ५ सप्टेंबर रोजी केली होती. त्यानंतर २७ व २८ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलनही केले होते. या समितीने मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून पैसे जमा करण्याची मागणी लावून धरली. शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याने सुकाणू समितीच्या आंदोलनाला यश आले आहे, अशी माहिती समितीचे लिंबाजी कचरे, बाळासाहेब आळणे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती