शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ३ आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत दोषारोपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:50 IST

शहरातील शांतीवन कॉलनीत झालेल्या दरोडा प्रकरणातील तीन आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालकांच्या परवानगीने या आरोपींविरुद्ध औरंगाबाद येथील विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल दाखल करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील शांतीवन कॉलनीत झालेल्या दरोडा प्रकरणातील तीन आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालकांच्या परवानगीने या आरोपींविरुद्ध औरंगाबाद येथील विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल दाखल करण्यात आले आहे.शहरातील दत्तधाम परिसरातील शांतीवन कॉलनीत ३० मे २०१९ रोजी ऋषिकेश वासुदेव चक्रावार यांच्या घरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण करुन १५ तोळे सोन्याचे दागिने (५ लाख रुपये) आणि चांदीचे दागिने व नगदी पाच हजार रुपये असा ५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी या प्रकरणात टोळी प्रमुख चेतन उर्फ मर्दा गिरीश उर्फ दगडू भोसले (रा.बोराडी गायरान, ता.गंगापूर), सदस्य नितीन सोमनाथ शिंदे (रा.मकोडी ता.सेनगाव), सतीश बिस्कीट्या पवार (रा.काशीनाथ लॉजच्या बाजूला, जळगाव) या तिघांना अटक केली. या चोरट्यांची यापूर्वीची गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची शिफारस पोलीस अधिक्षकांकडे केली होती. हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केल्यानंतर त्यांनी त्यास मंजुरी दिली. त्यानुसार या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ ची वाढ करुन पूर्णा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तपास सुपूर्द करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपी नितीन सोमनाथ शिंदे, सतीश बिस्कीट्या पवार आणि चेतन उर्फ मर्दा उर्फ दगडू भोसले या तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे कलम २३ (२) प्रमाणे औरंगाबाद येथील विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांनी परवानगी दिली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.व्ही. कर्डीले यांनी २२ नोव्हेंबर रोजी हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.पाच टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई४परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आतापर्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पाच टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.४पूर्णा, पाथरी, चारठाणा, कोतवाली आणि नवा मोंढा पोलीस ठाण्यांतर्गत मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यांपैकी ३ गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले असून, एकूण १० आरोपी अटक झाल्यापासून कारागृहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालय