शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यातच घेतला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:02 IST

पीक विमा जमा करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असल्याने पाथरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गर्दी होऊन रेटारेटी नियंत्रणाबाहेर जात असल्याने रविवारी पोलिसांनी यावर तोडगा काढला.

पाथरी (जि. परभणी) : पीक विमा जमा करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असल्याने पाथरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गर्दी होऊन रेटारेटी नियंत्रणाबाहेर जात असल्याने रविवारी पोलिसांनी यावर तोडगा काढला. शनिवारी अर्ज केलेल्या तब्बल ५०० शेतकºयांच्या विम्याची रक्कम चक्क पोलीस ठाण्यात स्वीकारण्यात आली.पीकविमा भरण्यासाठी ३१ जुलैची डेडलाईन असल्याने तसेच आॅफलाइन अर्ज भरून घेण्यासाठी सुरुवात झाल्यानंतर शनिवारपासूनच शहरातील सर्वच बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कासापुरी, बाभूळगाव, गुंज व पाथरी येथील शाखांमध्येही शेतकºयांनी तोबा गर्दी केली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार रविवारी देखील बँक शाखा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. पाथरी शाखेत ५०० शेतकºयांचे अर्ज रात्रीच ठेवून घेण्यात आले, तर गुंज येथील शाखेत संतापलेल्या शेतकºयांनी शटर तोडले. त्यामुळे पोलिसांनी रात्रभर पहारा दिला.आॅनलाइन अर्ज भरले जात असल्याने रविवारी सुटी असतानाही बँक शाखेचे कामकाज सुरू होताच जिल्हा बँकेत रेटारेटी सुरू झाली. बँकेत प्रवेश करण्यासाठी असलेल्या छोट्या रस्त्यावर कोंडी निर्माण झाली. शनिवारी अर्ज दिलेले शेतकरी व नव्याने आलेले शेतकरी असा वाद निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे यांनी शनिवारी आणि रविवारी आलेल्या शेतकºयांचे विभाजन करून पाचशे शेतकºयांच्या अर्जासह बँकेचे रोखपाल व इतर दोन कर्मचाºयांना पोलीस ठाण्यात नेले. सकाळी १०.३० पासून सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यातच या ५०० शेतकºयांच्या पीक विम्याचे पैसे स्वीकारण्यात आले.शेतकºयांची प्रचंड गर्दी-जालन्यात दिवसभर शेतकºयांची प्रचंड धावपळ पाहावयास मिळाली. सीएससी सेंटरची ‘क्रॉप इंश्युरन्स वेबसाइट’ दिवसभर डाऊन असल्याने शेतकºयांनी केंद्रासमोर रांगा लावल्या. दुसरीकडे पीकविमा भरण्यासाठी ग्रामीण व निमशहरी भागातील बँक रविवारी सुरू ठेवण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला अनेक बँकांनी केराची टोपली दाखविली. जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा वगळता अन्य बँका दिवसभर बंद होत्या. बीडमध्येही अनेक बँकांमध्ये शेतकºयांनी गर्दी केली होती. पश्चिम महाराष्ट्रात सातारा तसेच काही ठिकाणी असेच चित्र होते. जळगावात मात्र शेतकºयांचा थंड प्रतिसाद होता.