शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पालम, मानवत तालुक्यात सर्वात कमी रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST

परभणी : पालम आणि मानवत तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या पालम तालुक्यात दोन तर मानवत ...

परभणी : पालम आणि मानवत तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या पालम तालुक्यात दोन तर मानवत तालुक्यात १० उपचाराधीन रुग्ण आहेत. ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या घटल्याने, नागरिकांना आता काळजी घेऊन तिसरी लाट रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण जिल्ह्याला हादरून सोडले. अनेक रुग्णांना या लाटेत मृत्यूही पत्करावे लागले. आता ही लाट ओसरली असून, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. ग्रामीण भागात सध्या १४५ रुग्ण असून, पालम तालुक्यात २ तर मानवत तालुक्यात केवळ १० रुग्णांची नोंद झाली आहे. या दोन्ही तालुक्‍यांबरोबर इतर तालुक्यामधील ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या दोन आकड्यांवर आहे. कोरोनाचा संसर्ग आता लक्षणीयरित्या घटला असून, पुन्हा पुढे हा संसर्ग वाढू नये, यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वतःहून काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या १४५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ३० तर सेलू तालुक्यात २४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. परभणी तालुक्यात २१, पूर्णा १२, पाथरी १२, सेलू २४, गंगाखेड २१ आणि सोनपेठ तालुक्यात १३ रुग्ण उपचार घेत आहेत.

शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागातही बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ग्रामीण भागातही सर्व व्यवहार खुले असून, नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. या नियमांचे पालन केले नाही, तर रुग्ण संख्या आणखी वाढण्यास वेळ लागणार नाही.

दहा दिवसांमध्ये घटली रुग्णसंख्या

मागील दहा दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. ५ जून रोजी २१, ६ रोजी १६, ७ रोजी ११, ८ जून २०, ९ जून रोजी ५, १४ जून रोजी ११ रुग्णांची ग्रामीण भागांमध्ये नोंद झाली. सध्या १४५ रुग्ण या भागात उपचार घेत आहेत.

दहा दिवसांतील बाधित रुग्ण

५ जून : २१ ६ जून : १६ ७ जून : ११ ८ जून : २० ९ जून : ०५ १० जून : ०९ ११ जून : १३ १२ जून : २१ १३ जून : १८ १४ जून : ११

गर्दी टाळण्याचे आवाहन

जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या घटल्याने, सर्व व्यवहार खुले करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातही बाजारपेठ सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमधून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू नये, याची काळजी घेण्याची गरज आता ग्रामस्थांवर आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.