शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:14 IST

खरीप हंगामातील कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला असून, जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागातील तज्ञ वर्तवित आहे. कृषी विभागाने आता प्रादुर्भावाचे सर्वेक्षण सुरू केले असून, सर्वेक्षणाअंतीच या संकटाचे गांभीर्य समोर येणार आहे. दरम्यान, तक्रारी वाढू लागल्यानंतर अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने आता कुठे पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला असून, जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागातील तज्ञ वर्तवित आहे. कृषी विभागाने आता प्रादुर्भावाचे सर्वेक्षण सुरू केले असून, सर्वेक्षणाअंतीच या संकटाचे गांभीर्य समोर येणार आहे. दरम्यान, तक्रारी वाढू लागल्यानंतर अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने आता कुठे पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यात ५ लाख २१ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीेचे नियोजन झाले होते. त्यापैकी २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित होते. प्रत्यक्षात १ लाख ८७ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. बहुतांश भागात कापसाची पहिली वेचणी झाली असून, सर्वसाधारणपणे चार वेचण्या होतात. मात्र पहिल्याच वेचणीनंतर जिल्ह्यातील कापूस पिकाला शेंदरी बोंडअळीने (गुलाबी बोंडअळी) घेरल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्व भागामध्ये बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला आहे. एकही क्षेत्र प्रादूर्भावापासून बचावले नाही. त्यामुळे शेतकरी नव्या संकटात सापडले आहेत. कृषी विभागाबरोबरच प्रशासनालाही या संकटाची चाहूल लागल्यानंतर आता उपाययोजनेची कामे सुरु झाली आहेत.बोंडअळीचा प्रादूर्भाव होत असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील अनेक भागांमधून कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रादूर्भाव किती, या विषयीची पाहणी कृषी विभाग सुरू केली आहे. कृषी विभाग आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहाय्याने सर्व्हेक्षण सुरु झाले आहे. १ लाख ८७ हजार ५५७ हेक्टरवरील कापसापैकी ४० टक्के पिकावर प्रादुर्भाव असल्याची चर्चाही कृषी विभागातील तज्ज्ञांकडून ऐकावयास मिळाली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी आयसीआरचे अधिकारी परभणीत आले होते. या अधिकाºयांनी प्रायोगिक तत्वावर परभणी तालुक्यातील झरी आणि टाकळी कुंभकर्ण परिसरात क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत घेतलेल्या प्लॉटची पाहणी केली, तेव्हा १० बोंडापैकी ६ बोंडावर अळीचा प्रादूर्भाव आढळून आला, अशी माहिती मिळाली आहे. यास कृषी विभागातून अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी एकंदर ४० ते ५० टक्के प्रादूर्भाव झाल्याचा अंदाज आहे.कृषी विभागातील अधिकाºयांनी जिल्ह्यात गावनिहाय सर्व्हेक्षणाला सुरुवात केली आहे. हे सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर बोंडअळीच्या प्रादूर्भावाचा प्रत्यक्ष आवाका समोर येणार आहे. सध्या तरी बोंडअळीमुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आल्याचे दिसत आहे.दरम्यान, बोंडअळीच्या प्रादूर्भावासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे कृषी विभाग या संदर्भात काय उपाययोजना करीत आहे, या विषयीची माहिती मिळू शकली नाही.